Daily Mahasatta

Daily Mahasatta

बारावीला ७४ टक्के, तरी देखील विद्यार्थिनीने केली आत्महत्या

विटा (प्रतिनिधी)

बारावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर  पुढील शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने विटा- खानापूर रस्त्यावरील पंचशीलनगर परिसरात राहणाऱ्या प्रणोती संतोष यादव वय १९ या  विद्यार्थिनीने आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार शुक्रवार सकाळी ११ वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, विटा शहरातील पंचशीलनगर परिसरात राहणाऱ्या प्रणोती संतोष यादव ही मुलगी आपल्या कुटुंबियांसमवेत राहत होती. काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तिच्या आईने मोलमजूरी करुन दोन मुली आणि दोन मुलांचा सांभाळ केला गेला. नुकताच प्रणोती यादव हिचा बारावीचा निकाल लागला. प्रणोती हिने बारावीच्या परीक्षेत ७४ टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश मिळवले.

  परंतु, आज शुक्रवारी दुपारी अचानक घरात कोणीही नसल्याचे पाहून प्रणोतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली. आपल्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता येणार नाही अशी चिठ्ठी लिहून प्रणोतीने आत्महत्या केली आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त आहे. 

Post a Comment

0 Comments