Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्हा शिक्षण संस्थेकडून मा. पृथ्वीराज पाटील यांचा सत्कार


सांगली (प्रतिनिधी)
: सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांची जिल्हा विकास नियोजन समितीच्या सदस्यपदी झालेल्या निवडीबद्दल आज त्यांच्या निवासस्थानी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव कामगिरी व्हावी. पृथ्वीराज बाबा पाटील हे विकासाची चांगली दृष्टी असलेले लोकसेवक आहेत. लोकसेवेचे ते अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. यापुढेही त्यांच्या यशाची कमान चढती रहावी अशा शुभेच्छा रावसाहेब पाटील यांनी दिल्या. 

सत्काराला उत्तर देताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, '' कोरोना व महापूर काळात जनसेवा करता आली. सतत लोकांची कामे करीत रहाणे हा माझा छंदच आहे. यापुढेही असेच सर्वांचे सहकार्य लाभावे. ''प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी अरुण दांडेकर, विनोद पाटोळे, एम.एस.रजपूत, शिवपुत्र आरबोळे, संजय यादव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments