Daily Mahasatta

Daily Mahasatta

अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, विटा पालिकेत काम बंद आंदोलन


विटा ( प्रतिनिधी) ठाणे महानगरपालिकेच्या  सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे या दिनांक 30 ऑगस्ट 2021 रोजी माजीवाडा प्रभाग याठिकाणी सांयकाळी 5.30 च्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनाधिकृत हातगाडयावर कारवाई करत होत्या. यावेळी तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडी फेरीवाले अरजीत यादव यांने त्यांच्यावर व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्याअवर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला. त्या निषेधार्थ  विटा नगरपरिषदेचे श्री अतुल पाटील मुख्याधिकारी,सर्व अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने आज दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी एक दिवसाचे नगरपरिषदेचे दैनंदिन कामकाज बंद करुन जाहीर निषेध केला. 

      या घटनेचा आपण जाहीर निषेध करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी केली. याबाबत तहसीलदार ऋषिकेत शेळके, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य संघटनेचे अध्यक्ष अनिल पवार, आरोग्य निरीक्षक आनंद सावंत, सुजित पाटील, राजेंद्र जमदाडे यांच्यासह पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments