Daily Mahasatta

Daily Mahasatta

महापुराच्या तडाख्याने ५० हजार कोंबड्या दगावल्या : पोल्ट्री व्यावसायिकांची मदतीची मागणी

वाळवा (रहिम पठाण) 

महापुर ओसरल्यानंतर सांगली जिल्ह्यातील ५० ते ६० हजार बाॕयलर मांसल पक्षांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून सोबत खाद्य व भांडी असे लाखोचे नुकसान झाले आहे. अशा वेळी पोल्ट्री व्यावसायिकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम शासनाकडून  झाले आहे. त्यामुळे आम्हाला न्याय नाही मिळाला तर आत्मदहन करावे लागेल, असा इशारा जिल्ह्यातील पोल्ट्री धारकांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,२०२१ च्या महापुराने नदी किनाऱ्यावरील व्यावसायिक पोल्ट्री धारक यांचे अक्षरशा लाखोंचे नुकसान झाले. यामुळे कर्जाचा डोंगर उभा राहीला आहे.अशा वेळी पोल्ट्री व्यावसायिकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम शासनाकडून  झाले आहे.महापुर ओसरल्यानंतर जिल्ह्यातील ५० ते ६० हजार बाॕयलर मांसल पक्षी मृत्यू झाला असून सोबत खाद्य व भांडी असे लाखोचे नुकसान झाले आहे.आशातच शासनाने जे धोरण जाहीर केले त्यामध्ये प्रती पक्षी ५० रुपये व जास्तीत जास्त ५०००/- एका शेड साठी मदत जाहीर केली आहे.ही मदत म्हणजे आमची चेष्ठा आहे.अशा वेळी आमच्या पुढे कर्जाचा डोंगर उभा आहे आणि यामधून बाहेर पडण्यासाठी आम्हाला शासनाकडून खूप मोठी अपेक्षा होती पण जाहीर झालेली मदत व आमचे नुकसान याचा कोठेच मेळ लागत नाही त्यामुळे मानसिक दृष्ट्या हतबल झालो आहोत.

नागठाणे येथील युवा शेतकरी निलेश पवार यांनी केलेली आत्महत्या ही घटना ताजी असतानाच पोल्ट्री धारकांचा हा इशारा यामुळे माणसिक दृष्ट्या खच्चीकरणच आहे.अशा वेळी जर शासनाने सहानभूती पूर्वक विचार नाही केला तर आत्मदहन हाच आमच्या समोर पर्याय राहील असे निवेदनात म्हंटले आहे.

Post a Comment

0 Comments