Daily Mahasatta

Daily Mahasatta

मसुचीवाडी येथील जयकर निकम यांना अमेरिकेतील अकॅडमीचा नोबेल पिस पुरस्कार जाहीर


इस्लामपूर (प्रतिनिधी)

मसुचीवाडी, ता. वाळवा येथील
जयकर  भगवान निकम यांचा अमेरिकेतील अकॅडमीच्या वतीने नोबल पिस पुरस्कार व मानद डॉक्टरेट ने सन्मान होणार आहे . हा वितरण सोहळा अहमदाबाद येथे ४ सप्टेंबर रोजी होणार आहे .  त्यांनी गेली पंचवीस वर्ष विविध उद्योग व्यवसायात हजारो लोकांना वेगवेगळया संपल्पनेतून व्यावसायिक उद्योजक निर्माण केलेत त्यांच्या अथक योगदाना बद्दल  जयकर निकम यांना यापुर्वी राजीव गांधी युवा उद्योजक २०१४ दिल्ली येथे लाईफ टाईम लिडरशिप अचीव्हमेंट अवार्ड, नाशिक करोडपती अवॉर्ड २०१७,तसेच दादासाहेब फाळके आयकॉन आकॅडमीचा २०२१ चा छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कारआदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. नेल्सन मंडेला नोबल पिस अवार्ड अकॅडमी  अमेरिका यांचा २०२१ चा पुरस्कार जयकर निकम यांना त्यांच्या कार्याबद्दल नोबल पिस पुरस्कार तसेच द अमेरिकन युनिर्व्हसिटी अमेरिका यांना मानद डॉक्टर ०४/०९/२०२१ रोजी अहमदाबाद गुजरात येथे मुख्यमंत्री माननीय विजय रूपानी, राज्यपाल आचार्य देवरत, बोस्नीया चे राजदुत सुहास मंत्री, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, तसेच अनेक मान्यवरांचे
उपस्थितीत नोबल पिस पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच मानद डॉक्टरेट पदवी प्रदान समारंभ हस्ते मधु कृष्णण द अमेरिकन युनिर्व्हसिटीचे गव्हर्नर, अंबेसिटर पार्लमेंट ऑफ वर्ल्ड प्रिन्स, इन्टरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस तसेच ऑक्सफोर्ड हायर अकॅडमी ऑफ युनायटेड किगंडमचे गव्हर्नर यांच्या हस्ते  हा पदवी प्रदान समारंभ पार पडणार आहे.

Post a Comment

0 Comments