Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली महापालिकेला ९० कोटीचा निधी मिळावा


 : महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सांगली (प्रतिनिधी)
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पुरबाधीत क्षेत्रातील उपाययोजनांसाठी ९०.९२ कोटी व भविष्यकालीन उपाययोजनांसाठी रुपये ४८०.७५ कोटी इतके अनुदान उपलब्ध व्हावे, अशी मागणी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी 
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सांगली शहरात कृष्णा नदीस आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्य मंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे साहेब यांनी प्रत्यक्ष पहाणी करुन महापुराने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. पूराचे पाणी ओसरल्यानंतर पुरबाधीत क्षेत्रातील रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पाणी पुरवठा व्यवस्था, गटारी मोठ्या प्रमाणावर खराब झालेले असल्यामुळे सदरची कामे करणे तसेच पंपींग स्टेशन, जॅकवेल, शेरीनाला पाणी उपसा केंद्राची दुरुस्ती व यंत्र सामुग्री पुर रेषेपासून सुरक्षीत अंतरावर स्थलांतरीत करणे अशा तद्अनुषंगिक अत्यावश्यक कामे करावी लागणार असल्याने मा.ना.उध्दवजी ठाकरे मुख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचेकडे शासन स्तरावरुन तातडीच्या दुरुस्तीसाठी रुपये ९०.९२ कोटी व भविष्यकालीन उपाययोजनांसाठी रुपये ४८०.७५ कोटी इतके अनुदान उपलब्ध व्हावे अशी मागणी करणारे पत्र महापौर दिग्विजय सूर्यवंशी, व उपमहापौर मा. उमेश पाटील यांनी दिले. 

यावेळी विरोधी पक्ष नेते  उत्तम साखराळकर, राष्ट्रवादीचे गट नेते मैनुद्दीन बागवान,  संजय बजाज जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष मा. राहुल पवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments