Daily Mahasatta

Daily Mahasatta

नेत्रदान चळवळीसाठी सर्वानी पुढे यावे : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे


            सांगली, : राज्यात दरवर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर अखेर नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येतो. नेत्रदान व नेत्रसंकलन होत आहे, मात्र तुलनेत रूग्णांकडून मागणी अधिक आहे. नेत्रदानाची चळवळ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. नेत्रदान पंधरवड्याचा मुख्य उद्देश बुब्बुळाची मागणी व पुरवठा यामधील तफावत भरून काढणे असा आहे. जिल्ह्यात नेत्रदान चळवळ वाढीस लागण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी व्यक्त केले.

            नेत्रदान पंधरवडा निमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे आयोजित पोस्टर प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, बालरोगतज्ञ डॉ. सतिश आष्टेकर, दंतरोगतज्ञ डॉ. मनोज पवार, नेत्ररोगतज्ञ डॉ. अर्चना पाटणकर, जिल्हा नोडल अधिकारी (अंधत्व नियंत्रण) जे. जी. बाबर, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, जिल्हा नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे, अभिनंदन पाटील तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 

Post a Comment

0 Comments