Daily Mahasatta

Daily Mahasatta

महावितरणच्या मनमानी कारभारामुळे जत येथील विद्युत ठेकेदाराचा मृत्यु : मुस्तफा गवंडी

जत (प्रतिनिधी )
: जत येथील मे. फिरोज इलेक्ट्रिकल्स च्या महावितरण कडून विद्युत ठेक्याचे काम पूर्ण करूनही तीन वर्षाच्या मुदती नंतरही अद्याप विद्युत कंपनी कडून बिलांची रक्कम जमा करण्यात आलेल्या नाही. या महावितरणच्या मनमानी कारभारामुळे  जत येथील विद्युत ठेकेदाराचा मृत्यु झाला असल्याचे आरोप मे. फिरोज इलेक्ट्रिकल्स चे व्यवस्थापक मुस्तफा गवंडी यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

निवेदनात म्हटले की, ठेकेदाराने वारंवार बिलाच्या रकमा जमा करणे बाबत लेखी पत्राद्वारे व समक्ष भेटीद्वारे विनंत्या करूनही सदर बाबतीत जाणीवपूर्वक भेदभाव करून मनमानी कारभारा अंतर्गत ठेकेदाराच्या मनोधैर्यास धक्का दिल्याने मनोधैर्य खचून बँक व्याजास घाबरून व मटेरियल ची रक्कम देण्यास नाईलाज झाल्याने मानसीक त्रास होऊन औषध उपचार खर्चास पैशाची वेळेत उपलब्धता न झालेने घाबरून जाऊन गौसमहमद मिरासाहेब गवंडी हे अचानक मृत्युमुखी पडले. अशा जीव घेण्याच्या प्रसंगास विद्युत कंपनीच जबाबदार असलेचे दिसून येते अशा घडवून आणलेल्या घटनेमुळे एजन्सी च्या संपूर्ण कामावर परिणाम झालेला आहे.

तरीही एजन्सीने सदर मृत्यु नंतरही कंपनीकडे पुन्हा पुन्हा बिलांच्या रकमा मिळणे बाबत विनंती करूनही एजन्सीस दाद दिली गेली नाही. ही बाब शासनाच्या उद्देश व विद्युत कंपनीच्या नियमांचा जाणीवपूर्वक भंग करणारी बाब आहे. ठेकेदाराच्या कोणत्याच विनंतीस लेखी कारण देऊन अर्जास साधे उत्तरही दिलेले नाही म्हणून नाईलाजास्तव एजन्सीने कंपनी विरुद्ध कुटुंबात दुःखद घटना घडली असली तरी पुन्हा विनंती करून महाराष्ट्र शासनाकडे व विद्युत वितरण कंपनी कडे सदर बिलांच्या रकमा मिळण्याबाबत विनंती केलेली आहे. येणे असलेल्या बिलांच्या रकमा १३ सप्टेंबर पूर्वी खात्यावर जमा  न केल्यास नाईलाजास्तव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १६ सप्टेंबर रोजी आमरण उपोषणा  इशारा दिलेला आहे.

Post a Comment

0 Comments