Daily Mahasatta

Daily Mahasatta

अमोल दादांना शितलताईंच्या अनोख्या शुभेच्छा


विटा (प्रतिनिधी)
आमदार अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र आणि विटा नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक अमोल दादा बाबर यांचा वाढदिवस आज 17 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्त अमोल दादा यांना सांगली जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्यासह विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर सौ शीतल बाबर यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या खास शुभेच्छा लक्षवेधी ठरल्या आहेत.

डॉक्टर सौ शीतल बाबर यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हंटले आहे, " दादासाहेब… सामर्थ्य आणि सहनशीलता ही तुमची खासियत. पण माणसाच्या हृदयात थेट भिडणे हे मात्र तुमचे कौशल्य.. तुमच्याकडून जेवढे घेऊ तेवढं कमीच. कारण जेवढे मागू त्याच्या दुपटीने देण्याची दानत फक्त तुमचीच.. दादासाहेब, आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो.. अशा शब्दात शितलताई यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
       विशेष म्हणजे अवघ्या चार ओळीतच अमोल दादांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या पैलूंचा घेतलेला आढावा सोशल मीडियात कौतुकाचा विषय ठरत आहे.

Post a Comment

0 Comments