Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात व्यापाऱ्याला १८ लाखांचा गंडा


कुपवाड (प्रतिनिधी)
कुपवाड परिसरातील एका कोल्ड स्टोरेज मधील बेदाणा व्यापाऱ्याकडून १८ लाख ७ हजार रुपयांचा बेदाणा घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहती मध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भावेश कनक शहा यांनी फिर्याद दिली आहे.
    
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुपवाड औद्योगिक वसाहती मधील भावेश कनक शहा वय ३२ वर्षे, रा.फ्लॅट नं ए 1/7 जवाहर हौसिंग सोसायटी नविन रेल्वे स्टेशन समोर, सहयाद्रीनगर यांनी दि .५ मार्च ते दि २२ मार्च २०२१ या वेळेत वेळोवेळी अनुज गुप्ता (पतंजली आयुर्वेद लि. हरीद्वार पोस्ट धानपुरा, लष्कर रोड हरीदद्वार) यास माल दिला होता. परंतु अनुज गुप्ता यांनी मालाचे पैसे दिले नसल्याने भावेश कनक शहा यांने कुपवाड एम आय डी सी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद  दाखल केली  आहे.
      

Post a Comment

0 Comments