Daily Mahasatta

Daily Mahasatta

आमदार विक्रमसिंह सावंत यांचे सांगली नगरीत जल्लोषी स्वागत


सांगली, प्रतिनिधी
: सांगली ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी आज काँग्रेस कमिटीला भेट दिली. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

आमदार सावंत यांची नुकतीच जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे. या निवडीनंतर ते पहिल्यांदाच  काँग्रेस कमिटीमध्ये आले. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

तत्पूर्वी नवे अध्यक्ष आ. सावंत यांनी कृष्णा नदीकाठावर दिवंगत नेते वसंतदादा पाटील, विष्णुअण्णा पाटील, मदन पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
      यावेळी जितेश कदम यांच्यासह सांगली दक्षिण शहर काँग्रेस, मिरज शहर काँग्रेस, कुपवाड शहर काँग्रेस, व एन एस यु आय, सेवादल, अल्पसंख्यांक विभाग, युवक काँग्रेस, शेतकरी सेल, मागासवर्गीय सेल, ओबीसी सेल, स्वातंत्र्यसैनिक सेल, आदी संघटनांचे सर्व अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
-------

Post a Comment

0 Comments