Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यातील स्टार क्रीडा मंडळाच्या खेळाडूची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड


विटा (प्रतिनिधी)
शेवगांव जिल्हा अहमदनगर येथे दि. ५ ते ८ सप्टेंबर २०२१ रोजी होणाऱ्या ४७ व्या कुमार/मुली (१८ वर्षाखालील) राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी कु. विश्वजीत प्रकाश जाधव याची सांगली जिल्हा कुमार (१८ वर्षाखालील)  संघात निवड झाली आहे. विश्वजीत हा स्टार क्रीडा मंडळाचा अष्टपैलू खेळाडू आणि महात्मा गांधी विद्यामंदिर विटा चा विद्यार्थी आहे. त्यास मंडळाचे मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार श्री देवदत्त (काका) राज्योपाध्ये यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र उर्फ राजू भैया गुजले, उपाध्यक्ष व प्रशिक्षक श्री विशाल भैया भिंगारदेवे खजिनदार अमोल भैया नायर, सर्व सीनियर खेळाडू यांचे प्रशिक्षण लाभले.

Post a Comment

0 Comments