Daily Mahasatta

Daily Mahasatta

बैलगाडी शर्यतीच्या पार्श्वभूमीवर झरे तालुका आटपाडी येथे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल  सांगली.  : झरे तालुका आटपाडी येथे मा. सर्वोच्च न्यायालयाचे बैलगाडी शर्यत बंदीचा आदेश असतानाही बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. मा.न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणेसाठी सदर ठिकाणी शर्यतीसाठी येणारी  वाहतूक बंद करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ अन्वये दिनांक २० ऑगस्ट २०२१ रोजी २४.०० या वेळेपर्यंत खालील मार्गावर सर्व वाहतूक (पोलीस वाहने, अम्बुलन्स, फायर बिग्रेड या वाहनांखेरीज खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

१) कराड ते पंढरपुरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी वाहतूक कराड-मायणी-विटा-मियघाट आटपाडी दिघंची मार्गे पंढरपूर 

२) कराड ते पंढरपुरकडे जाणा-या वाहनांसाठी पर्यायी वाहतूक कराड-मायणी-कुक्कडवाड-म्हसवड मार्गे पंढरपूर 

३) पंढरपुर ते कराड कडे जाणा-या वाहनांसाठी पर्यायी वाहतूक पंढरपूर-दिघंची-आटपाडी भिवघाट-विटा-मायणी मार्गे कराड 

४) पंढरपुर ते कराड कडे जाणा-या वाहनांसाठी पर्यायी वाहतूक पंढरपूर-दिघंची आटपाडी भिवघाट-पिटा मायणी मार्गे कराड

५) झरे ते खरसुंडी जाणा-या वाहनांसाठी पर्यायी वाहतूक झेरे विभूतवाडी-तरसवाडीफाटा घरनिकी मार्गे खरसुंडी

६) खरसुंडी ते झरे जाणा-या वाहनांसाठी पर्यायी वाहतूक खरसुंडी घरनिकी पिंपरीवुदुक तरसवाडीफाटा-विभूतवाडी मार्गे झरे करण्यात आली आहे.सदर आदेशाचे उल्लंघन करणायास महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

0000

 

Post a Comment

0 Comments