Daily Mahasatta

Daily Mahasatta

लग्नाच्या अमिषाने विवाहितेवर बलात्कार, नगरसेवकाचा पूत्र झाला गजाआड


कोल्हापूर  (प्रतिनिधी)
     विवाहित महिलेशी ओळख वाढवून, तिला पतीपासून घटस्फोट घे, मी तुझ्याशी लग्न करतो असे सांगून जबरदस्तीने तिचे लैंगिकशोषण करण्याऱ्या तरुणावर शाहूपुरी पोलीसात गुन्हा दाखल झाला. पिडीत महिलेने तक्रार दिल्यानंतर अमित आनंदराव मलगुंडे (वय ४० रा. इस्लामपूर ता. वाळवा, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो इस्लामपूरातील नगरसेवक पूत्र असल्याचे समजते.
 
शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  पिडीत महिला ३९ वर्षाची असून ती मुळची विश्रामबाग, सांगलीची आहे. सध्या कोल्हापुरात पतीकडे रहात होती. संशयित अमित मलगुंडे व पिडीत महिलेची ओळख आहे. जानेवारी,२०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत अमितने पिडीतेशी लग्न करतो, तू पहिल्या पतीपासून घटस्फोट घे, असे सांगितले. तसेच मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील काही लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला.
  
त्यानंतर पिडीत महिलेबरोबर लग्न करणार नाही,असे म्हणून तिला ठार मारण्याची धमकी दिली. आपली फसगत झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीसांनी संशयित अमित मलगुंडे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments