Daily Mahasatta

Daily Mahasatta

शेगाव येथे होणार २४ वे ग्रामीण साहित्य संमेलन


जत,(सोमनिंग कोळी)
-मराठी साहित्य सेवा मंच,डॉ. बलभीम मुळे स्मृती फाउंडेशन व ओम साई प्रतिष्ठान, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथील चिंच विसावा येथे २४ वे ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती साहित्य सेवा मंचचे अध्यक्ष किरण जाधव, मच्छिंद्र ऐनापुरे व लवकुमार मुळे यांनी दिली.

या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संपतराव जाधव असणार आहेत. यावेळी पहिल्या सत्रात  दुपारी2 ते 3 या वेळेत कवी लवकुमार मुळे यांच्या 'कवीने पिंजून घ्यावा भोवताल' व कवी महादेव बुरुटे यांच्या 'पिंपळपान डॉट कॉम' या पुस्तकांचे प्रकाशन व अध्यक्षीय भाषण  होणार आहे. नंतर  'नव्या पिढीला वाचनसंस्कृतीकडे कसे आणता येईल?' या विषयावर परिसंवाद होणार आहे.  यात पत्रकार शिवराज काटकर , दिगंबर शिंदे, नामदेव भोसले सहभागी असणार आहेत.
तिसऱ्या सत्रात श्रावणसर कविसंमेलन होणार आहे. इंद्रजीत घुले (मंगळवेढा) हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. संतोष जगताप,  (लोणविरे),ज्योतिराम फडतरे, (वाटंबरे),रवी सांगोलकर,रशीद मुलाणी, रावसाहेब यादव,दिनराज वाघमारे,केशव सुर्वे,माणिक कोडग आदी कवींचा सहभाग होणार आहे. संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी विजय नाईक, मोहन मानेपाटील, कुमार इंगळे,समाधान माने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments