Daily Mahasatta

Daily Mahasatta

' एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल : आ. गोपीचंद पडळकर


सांगली (प्रतिनिधी)
ओबीसी बांधवावर फक्त घोषणांचा पाऊस पाडायचा अन प्रत्यक्षात मात्र ओबीसी भटक्या विमुक्तांच्या तोंडाला फक्त पान पुसायची. एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल. त्यामुळे  ' घोषणाबहाद्दर ‘ वड्डेटीवारांनी राजीनामा द्यावा अशा कठोर शब्दांत
आ. गोपीचंद पडळकर यांनी मंत्री विजय वड्डेटीवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

आ. गोपीचंद पडळकर यांनी मंत्री विजय वड्डेटीवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे, लोकसंख्येने सर्वाधिक असणारा व विकासाच्या मुख्यप्रवाहात नसणारा ओबीसी, भटका विमुक्त समाज महाराष्ट्रात ५२ टक्के आहे. या समाजाला दुय्यम वागणूक देत प्रस्थापितांनी फक्त त्यांना वापरण्याचं राजकारणं केलं. या समाजासाठी त्यांनी काहीही केलं तर नाहीच ऊलट कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या काळात वसंतरावनाईक भटके विमुक्त महामंडळ तर यांनी दाखवायलाही ठेवलं नव्हतं.

यासर्वांवर उपाय म्हणून मा. देवेंद्र फडणवीसांनी महाज्योतीची स्थापना करून तातडीने ३८० कोटींचा निधीही मंजूर केला. पण आता ठाकरे सरकारच्या कार्यकाळातले सध्याचे महाज्योतीचे अध्यक्ष विजय वड्डेटीवार यांनी या  महाज्योती संस्थेचं वाट्टोळं केलं आहे. ओबीसी, मदत व पुर्नवसन आणि चंद्रपूरचं पालकमंत्रीपद अशी तीन-तीन पदं भुषवूणही  महाजोतीचं पद यांना कशाला मिरवायचंय? आणि नागपूर पासून १५० किलोमीटर दूर असणाऱ्या गोंदीया जिल्ह्यातला अधिकारी प्रदीप डांगेला महाज्योतीचा अतिरिक्त कार्यभार नेमका दिलाय का? आणि कशासाठी? असा सवाल आ. पडळकर यांनी केला आहे.
 
वड्डेटीवारांनी दोन वर्षात साधा फलकही महाज्योतीचा ॲाफीसला लावता आला नव्हता. पहिले आठ महिने अधिकाऱ्यांना साध्या बुड टेकावायला खुर्च्याही देता आल्या नाही. मोठ्या दिमाखात आपण घोषणा केल्या की १० हजार विद्यार्थ्यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देऊ, युपीएसीच्या विद्यार्थ्यांना खासगी संस्थेत प्रशिक्षण देऊ, उच्चशिक्षणासाठी ३१ हजाराची फेलोशिप देऊ, ओबीसींसाठी ७२ वसतिगृह उभारू, नीट-सीईटीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन ट्रेनिंग देऊ, युपीएससीच्या मुख्य परिक्षा पास झालेल्यांना दिल्ली मुलाखतीसाठी २५ हजार देऊ, नाशिक-औरंगाबादमध्ये उपविभागीय कार्यालय उभारू, महाज्योतीच्या स्वतंत्र कार्यालयासाठी ६० लाख रू देऊ. इतकेच नाहीतर गाजावाजा करून महाज्योती संस्थेला १५५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला पण तुमच्या नाकर्तेपणामुळे आपल्याला त्यातले ३५ कोटी पण खर्च करता आले नाही.

म्हणजे वड्डेटीवारांनी या घोषणांच्या नावाखाली आपल्या तोंडाची फक्त वाफ केली. तरीही प्रसिद्धीसाठी २ कोटी रूपये का खर्च केले? या प्रश्नांची उत्तर ‘घोषणाबहाद्दर ‘ वड्डेटीवारांनी द्यावीत नाहीतर नाहीतर राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments