Daily Mahasatta

Daily Mahasatta

उपसंचालक भूमी अभिलेख यांचा कॅम्प सांगलीत घ्यावा : विशाल पाटील यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी


सांगली (प्रतिनिधी)
पुणे येथील उपसंचालक भूमी अभिलेख आणि अप्पर आयुक्त यांचा अपिल करण्यासाठी असलेला कॅम्प सांगली मध्ये सुरू करावा, अशी मागणी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विशाल पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.   

पुणे येथील उपसंचालक भूमी अभिलेख आणि अप्पर आयुक्त यांचा भूमी अभिलेख संबंधित अपिल करण्यासाठी कॅम्प सुरू करण्यात आला आहे. हा कॅम्प सांगली परिसरात घेतल्यास नागरिकांच्या दृष्टीने  सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे हा कॅम्प सांगलीत व्हावा, अशी लोकांची मागणी होती. त्यानुसार आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन मागणी केली. महसूलमंत्री थोरात यांनी देखील याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर कॅम्प सुरू करू, असे आश्वासन दिले.

यावेळी युवा नेते विशाल पाटील यांच्या समवेत अ‍ॅड. अमोलजी चिमन्ना, अ‍ॅड. प्रमोदजी भोकरे,  अ‍ॅड. प्रमोद सुतार,  अ‍ॅड.किरणजी राजपूत, अ‍ॅड. प्रमोद कटाणे, अ‍ॅड.  शीतल मदवाने, अ‍ॅड. शिवाजीराव साळुंखे, अ‍ॅड. प्रकाश लोखंडे,  अ‍ॅड. जहांगीर जमखंडीकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments