Daily Mahasatta

Daily Mahasatta

पीपीई कीट उघड्यावरच टाकली, सांगली जिल्ह्यात उडाली खळबळ


वांगी (ता .कडेगाव )  आरोग्य केंद्राच्या परिसरात उघड्यावरतीच वापरलेली पीपीई कीट टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गलथान कारभाराला कोण जबाबदार आहे ? असा सवाल येथील ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. तसेच याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील ग्रामस्थांमधून होत आहे.


कडेगाव , (सचिन मोहिते)
वांगी (ता .कडेगाव ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वापरलेली पीपीई किट उघड्यावरच टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कडेगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यातच मोठी खळबळ उडाली आहे.

स्व. डॉ. पतंगराव कदम यांचे अथक प्रयत्नातून मंजूरी मिळालेले व ग्रामस्थांनी आम विश्वजीत कदम यांचेकडे पाठपुरावा केल्यामुळे बऱ्याच अडचणीतून प्राथमिक आरोग्य केंद्राची सर्व सोयींनीयुक्त टोलेजंग इमारत वांगी येथे उभा राहिली. पदनिर्मिती नसल्यामुळे आरोग्य केंद्र सुरू होऊ शकले नाही. परंतु काही महिन्यापूर्वी मंत्री विश्वजीत कदम यांचे प्रयत्नातून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पदनिर्मितीच्या प्रस्तावास मान्यता देण्याचे आदेश आरोग्य कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते . त्यानंतर सदर इमारतीत काही दिवस कोव्हिड सेंटर सुरु करणेत आले होते.  कोव्हिड सेंटर बंद झालेनंतर लगेचच इतर आजारांवर उपचार सुरू करून आरोग्य केंद्र चालू करणार आहोत असे आरोग्य विभाग व प्रशासना कडुन  सांगणेत आले होते.

कोव्हिड सेंटर बंद होऊन दहा ते बारा दिवस झाले असून देखभाल करणेसाठी याठिकाणी सफाईकामगार देखील नाही. नुकताच वांगी (ता .कडेगाव )  आरोग्य केंद्राच्या परिसरात उघड्यावरतीच वापरलेली पीपीई कीट टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गलथान कारभाराला कोण जबाबदार आहे ? असा सवाल येथील ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. तसेच याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील ग्रामस्थांमधून होत आहे.


Post a Comment

0 Comments