Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठ गावात भरवस्तीत घुसला बिबट्या,परिसरात भीतीचे सावट


पेठ (रियाज मुल्ला):
पेठ ता.वाळवा येथील माणकेश्वर गल्लीच्या भरवस्तीत  बिबट्याचे दर्शन झाल्याने पेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    काल रात्री 10 च्या सुमारास  पेठ येथील माणकेश्वर गल्लीच्या भर वस्तीत बिबट्या ने माणिक माळी यांच्या घराजवळून पडक्या जागेतून मार्गक्रमण केल्याचे विजय धोत्रे, संतोष माळी, अक्षय माळी यांनी पाहिले.
   रमेश माळी यांच्या शेतपरिसराच्या बाजूने टायर बंधाऱ्यावरून माणकेश्वर गल्लीत  बिबट्याने प्रवेश केल्याने परिसरातील नागरिकांची भीतीने गाळण उडाली. नागरिकांनी बिबट्याला हुसकावण्यासाठी फटाके फोडले.  बिबट्या जवळच असणाऱ्या पाणंद रस्त्यावरून अंधारातच गायब झाला.
    प्रथम दर्शनी पाहणारे विजय धोत्रे यांनी सांगितले की बिबट्या पूर्ण वाढ झालेला असून ओढापात्रातून तो माणकेश्वर गल्लीत घुसला. या आधी माळरान परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता अन एक रेडकू फस्त केले होते. यावेळी मात्र चक्क भरवस्तीत बिबट्याचे आगमन झाल्याने भीती चे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments