Daily Mahasatta

Daily Mahasatta

माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी मानले पालकमंत्री जयंत पाटील यांचे आभार, म्हणाले...


जत ( सोमनिंग कोळी )
:जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या ६५ गावासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कृष्णा खोरेतून (वारणा उद्भव) सहा टीएमसी पाणी मंजूर केले आहेत. त्यांच्यामुळे म्हैसाळ विस्तारित पाणी योजनेला बळ मिळाले आहे. या योजनेसाठी अंदाजपत्रकीय, प्रशासकीय व आर्थिक तरतूद या बाबी मंजूर करून घेतील. पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल जलसंपदामंत्री पाटील यांचे अभिनंदन व आभारी आहे. ही योजना मंजूर व्हावी म्हणून वेळोवेळी पाठपुरावा उपोषणही केले होते, अशी माहिती केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य तथा मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी दिली.
    
तालुक्यातील वंचित गावासाठी प्रस्तावित असलेल्या विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी ६ टीएमसी पाणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उपलब्ध करून दिल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला .याप्रसंगी जमदाडे यांनी आपले मत व्यक्त केले. मंत्री पाटील यांच्या सत्कारप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब ,भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष  चंद्रकांत गुडोडगी,माजी उपसभापती जे. के .माळी ,राजारामबापू संस्था संखचे सचिव सुभाष बसवराज पाटील,अंकलगी सर्व सोसायटीचे चेअरमन मुल्ला,महादेव बगली  ,भीमराव नलवडे,शंकरराव गायकवाड ,बी. आर. पाटील ,सिद्र्या जंगम , निगडी सोसायटीचे चेअरमन बाळकृष्ण शिंदे ,धनाजी जाधव आदी उपस्थित होते.
    
जमदाडे म्हणाले  ७ फेब्रुवारी  २०१९ रोजी अंकलगी येथे  खासदार संजय पाटील यांचे संकल्पनेतून तत्कालिन आमदार विलासराव जगताप , अधीक्षक अभियंता हनमंत गुणाले , व कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे  यांचे माध्यमातून विस्तारित योजनेची प्रस्तावित चित्रफीत सादर केली होती. दरम्यान,तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिल्याचे  संख येथे जाहीर केले होते ,त्यावेळी पासून मी व माझे सहकारी ही योजना मंजूर व्हावी म्हणून सातत्याने पाठपुरावा करत आहे . मी स्वतः विस्तारित योजनेला मान्यता दयावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  ,उपमुख्यमंत्री अजित  पवार ,जलसंपदामंत्री जयंत पाटील , खा. संजय पाटील  यांचेकडे पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेटून  पाठपुरावा केला आहे.
तसेच विस्तारित योजनेच्या मंजुरीसाठी १जानेवारी २०२० व १ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रांत कार्यलयासमोर तालुक्यातील पदाधिकारी व शेतकऱ्यांना सोबत घेऊन उपोषण केले होते .सततचा पाठपुरावा व जनमताचा आदर करून जलसंपदामंत्री जयंत पाटील पाणी उपलब्धतेसाठी खूप प्रयत्न केले होते व पाणी उपलब्ध झाले आहेत. त्यांची तालुक्याबद्दल असणारे प्रेम व आस्था यातून दिसून येते. लोकनेते कै.राजारामबापू यांनी उमदी पर्यंत केलेली पदयात्रा व त्यांचे जत तालुक्यावरती असणारे विशेष प्रेम यामुळे त्यानी जिद्दीने ६ टीएमसी पाणी उपलब्ध केले .जत तालुक्याच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करतो. आता लवकरात लवकर तांत्रिक , प्रशासकीय मंजुरी देऊन निधीची तरतूद करून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मिळेल अशी व्यवस्था करावी  तालुक्यातील जनता कायम त्यांचे ऋणी राहतील असा आशावाद जमदाडे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments