Daily Mahasatta

Daily Mahasatta

तमन्नगोडा रविपाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा


जत (सोमनिंग कोळी)
: भाजपचे जत तालुक्याचे नेते आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती ,नियोजन समितीचे सदस्य ,श्री गजानन शिक्षण संस्थेचे चेअरमन तमन्नगोडा रवि पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 
यानिमित्त जत तालुक्यातील जाडर बोबलाद या त्यांच्या शिक्षण संस्थेच्या आवारात भव्य रक्तदान शिबिर, कोविड योद्धा सन्मान, पत्रकाराचा सन्मान, तालुक्यातील 340 अंगणवाडी सेविकांना साडी आणि सन्मान शिल्ड देवून सत्कार, अन्नदान, गरजू लोकांना किराणा किट वाटप, आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

जत तालुक्यात सध्या चर्चेत असलेले भाजपचे नेते म्हणून सभापती रविपाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वावर जिल्ह्यातील महत्वाची ख्याती असलेल्या शिक्षण व आरोग्य विभागाची जबादारी यशस्वी पार पाडत दुष्काळी तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग तालुक्यात आहे. २५ ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र दुड्डी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते कोविड योद्धा सन्मान, साडी व सिल्ड देवून सत्कार तसेच बालगाव मठाचे अमृतांनद स्वामीजी यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे, मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र दुड्डी, डॉ.अमृतांद स्वामीजी,तुकाराम बाबा महाराज,भाजपचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख,डॉ. रविंद्र आरळी, संजयकुमार तेली, सुनील पवार, उमेश सावंत ,चंद्रकांत गुडोडगी, लक्ष्मण जखगोड यांच्यासह अनेक नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोना काळात रवि पाटील यांनी दानशूर व्यक्ती म्हणून आपली ख्याती दाखवली होती. तालुक्यातील नागरिकांना त्यांनी कोरोनाच्या प्रकोपात मोठा दिलासा दिला होता. त्यामुळे प्रत्येक कार्यात अग्रेसर असणारे रविपाटील यांनी जत तालुक्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख व स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे.

त्यामुळेच तालुक्याच्या राजकीय वर्तुळात देखील रवि पाटील यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांच्यावरील प्रेमापोटी गावोगावी रक्तदान शिबिर आणि क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २५ ऑगस्ट रोजी रवि पाटील यांचा वाढदिवस असताना तालुक्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून
नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

Post a Comment

0 Comments