Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत पुरग्रतांना एक महिना पुरेल इतक्या धान्याचे वाटप


सांगली (प्रतिनिधी)
वसुधा फौंडेशन आणि शिवसेना सांगली यांच्या वतीने ५० पूरग्रस्तांना महिना भर पूरेल एवढे जीवनावश्यक साहित्याचे वाटप सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालीकेचे शहर अभियंता श्री संजय देसाई यांचे हस्ते करण्यात आले.
     वसुधा फौंडेशन ने हा उपक्रम गेली १०/१२ दिवस राबवून समाजा मध्ये वेगळा आदर्श निर्माण केला.
या कार्यक्रमास शिवसेना कुपवाड शहरप्रमुख रूपेश मोकाशी, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रसाद रिसवडे,शिवसेना विभागप्रमुख आणि वसुधा फौंडेशन चे अध्यक्ष संतोष पाटील,माजी उपशहर प्रमुख राहूल बाबर,माजी वहातुक सेना शहरप्रमुख ओंकार देशपांडे, माहिती अधिकार कार्यकर्ते राजू सपकाळ, शिवसैनिक धनाजी कोळपे, प्रसिध्द व्यापारी ज्ञानदेव माळी,संतोष माळी,जयकुमार खोत (सर) इत्यादी असंख्य शिवसेना पदाधिकारी,वसुधा फौंडेशन चे सदस्य, नागरिक  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments