Daily Mahasatta

Daily Mahasatta

मिरज एमआयडीतील रस्त्यांबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांचा महत्वपूर्ण निर्णय


: आयुक्त नितीन कापडणीस यांची ग्वाही
: कामाला गुरुवारपासून सुरवात होणार 

सांगली प्रतिनिधी
मिरज एमआयडीसी क्षेत्रातील विविध अडचणी संदर्भात आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांची एमआयडीसीतील उद्योजकांनी भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यामध्ये गुरुवारपासून मिरज एमआयडीसीमधील मुख्य रस्त्यावरील खड्डे पॅचवर्क करण्याचे काम सुरू करण्यात येईल अशी ग्वाही आयुक्त कापडणीस यांनी दिली. 

मनपा मुख्यालयातील आयुक्त दालनात झालेल्या बैठकीत आयुक्त नितीन कापडणीस आणि उद्योजक यांच्यात रस्ते, स्वच्छता, कचरा उठाव तसेच स्ट्रीटलाईट या विषयावर चर्चा झाली.  या चर्चेनंतर आयुक्त नितीन कापडणीस यांनी एमआयडीसीमधील विविध प्रश्न समजून घेत तातडीने कार्यवाहीबाबत महापालिका प्रशासनाला आदेश दिले. यामध्ये बुधवार दिनांक २५ पासून रस्त्याकडील गटारांची स्वच्छता, झाडंझुडपं काढणेसाठी एक जेसीबी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर गुरुवार पासून तीन घंटा गाडी संध्याकाळच्या वेळी एमआयडीसी मधून कचरा गोळा करण्यासाठी फिरवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या यंत्रणेमार्फत गुरुवारपासून रस्त्यावरील पँचवर्कचे काम सुरू करण्यात येणार आहे तर बंद असलेले स्ट्रीट लाईटचा सर्व्हे करून एमआयडीसी कडून तातडीने सुरू करून घेण्याचे आदेशही आयुक्त कापडणीस यांनी या बैठकीत मनपा अधिकाऱ्यांना दिले.
   
या महत्वपूर्ण  बैठकीसाठी सांगली मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष संजय खांबे, माजीअध्यक्ष संजय आराणके, सचिव हर्षल खरे, सहसचिव मनोज पाटील,संचालक अतुल पाटील, व्यवस्थापक गणेश निकम  तसेच महापालिकेचे महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय देसाई, विद्युत विभाग प्रमुख अमर चव्हाण,आरोग्य अधिकारी डॉ. संजय ताटे साहेब तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments