Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूर येथील महाजलतरण टीमची अनोखी कामगिरी


इस्लामपूर (प्रतिनिधी)

सायकल चालवा आणि प्रदूषण टाळा, असा संदेश देत येथील महाजलतरण सायकलिंग ग्रुपच्या २६ सदस्यांनी १८ तासात इस्लामपूर ते पंढरपूर व परत पंढरपूर ते इस्लामपूर अशी सायकल रॅली काढून ३३२ किलोमीटरचा प्रवास करुन पूर्ण केला .

सायकल चालवा पर्यावरण वाचवा, इंधन वाचवा, सायकल चालवा आरोग्य राखा अशा प्रबोधनात्मक जनजागृतीचा उद्देश ठेवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा छोटासा प्रयत्न ग्रुपने प्रयत्नाने सफल झाला. गेल्या ३ वर्षापूर्वी महाजलतरण सायकलींग ग्रुपची स्थापना झाली. यापूर्वी त्यांनी चांदोली, कराड, सांगली, औदुंबर, मच्छिंद्रगड, मल्लिकार्जुन, शिराळा नाथ मंदिर, डोंगरवाडी, सागरेश्वर अशा अन्य ठिकाणी जावून सायकल चालवा, प्रदूषण टाळा, असे आवाहन करीत स्वच्छता अभियानही राबविण्यात आले. या ग्रुपने दररोज ३५ ते ४० कि.मी. सायकलींगचे सातत्य ठेवले आहे.
गुरूवारी पहाटे ३.३० वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही सायकल रॅली पंढरपूरला रवाना झाली. सायकल रॅलीचे विटा येथे सायकल क्लबच्या सदस्यांनी तसेच न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.

सायकल रॅली पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर सोलापूरचे उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी अरविंद माळी,  गणपत पवार, तहसिलदार यांनी स्वागत केले.
परतीच्या रॅलीतही वाटेत अनेकांनी स्वागत केले. दुसऱ्या दिवशी रॅली इस्लामपूर येथे आल्यानंतर नगरसेवक विक्रम पाटील, इंजि. असोसिएशनचे महेश मोरे, आदर्श बालक मंदिरचे पर्यवेक्षक राजेंद्र फडतरे, विकास जाधव, नामदेव जाधव, आकाश टोपरे, शिला फडतरे, प्रतिभा
जाधव यांनी स्वागत केले.

Post a Comment

0 Comments