Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोल्हापूरात मटका किंग विजय पाटीलसह ११ जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या


कोल्हापूर (पांडुरंग दळवी)
कांडगाव ता. करवीर सुरु असलेल्या  मटका  अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यावेळी मटका किंग विजय पाटील सह  ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन करवीर पोलीस  ठाण्यात गुन्हा  दाखल केला आहे.  त्यांच्याकडून ४१ हजारच्या रोख  रक्कमेसह मोबाईल, मोटारसायकल , जीप  असा सुमारे सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . सोमवारी  ता.१६ रात्री  हि कारवाई झाली.  'कोल्हापुरात मटका तेजीत ' या शीर्षकाखाली  दैनिक  महासत्ताने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर दोन दिवसातच पोलिसांनी मोठी कारवाई  केली.  

          या प्रकरणी मटका किंग विजय लहू पाटील (वय ५० रा.कांडगाव), पांडुरंग दत्तात्रय चव्हाण (वय ६२ रा. कांडगाव), दत्तात्रय बापू पाटील (वय ४५ रा.देवाळे), विजय बळवंत पाटील (वय ३५), उदय हिंदूराव चव्हाण (वय ४२), युवराज बाळू पाटील (वय ४२ रा. वाशी), अनिल नंदकुमार लोखंडे (वय १९ रा. देवाळे), सागर मारुती घोटणे (वय ३९ रा. कांडगांव ता. करवीर), अमित आनंदराव लोखंडे (वय २८), शहाजी बाळासाहेब पाटील (वय ४३), अमित अतूल भट (वय ३५ रा.कांडगांव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
        करवीर तालुक्यातील कांडगावात  मटका किंग विजय पाटील याच्या मालकीच्या हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये मटका घेत होता, तसेच त्या ठिकाणी मटक्याचे कलेक्शन केले जाता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना कारवाई करण्याचे आदेश दिली., त्यानुसार श्री. सावंत यांनी  एक पथक तर करून सोमवारी रात्री त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी मटका  मालक विजय पाटील सह ११ जण  घोळका करून त्या ठिकाणी पैसे मोजत बसले होते.  काही जण मद्यप्राशन करीत बसले होते. सोशल डिस्टन्स, विना मास्क बसून कोरोना नियम मोडले जात होते. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केली. या कारवाई ११ मोबाईल,४ दुचाकी, एक कार, देशी विदेशी दारुच्या बाटल्या, रोख रक्कम असा ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. करवीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पुढील तपास करीत आहेत.
-------
  मटका, जुगार जोमात
जिल्ह्यात मटका व जुगार सध्या जोमात सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत पोलीस ठाण्यांना सक्त ताकीद देऊनही मटका बंद झालेला नाही. त्यामुळे नागरीकातून पोलीसांच्या धोरणांबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Post a Comment

0 Comments