Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीच्या सुंदरनगर वेश्या वस्तीत लसीकरण पूर्ण


सांगली (प्रतिनिधी)
सांगलीच्या सुंदरनगर वेश्या वस्तीमधील वारांगणाचे शंभर टक्के कोविड लसीकरण पार पडले. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यामुळे या वारांगणाचे लसीकरण पूर्ण झाले. यासाठी साखर कारखाना आणि जामवाडी आरोग्य केंद्राची मोठी मदत लाभली.
     सांगलीच्या सुंदरनगर वेश्या वस्तीतील महिलांना लसीकरण आवश्यक होते. याबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी लसीकरणकरण्याबाबत आरोग्य यंत्रणेला सूचित केले होते. यानुसार सहायक आरोग्यधिकारी डॉ वैभव पाटील , डॉ वैशाली पवार आणि डॉ वर्षा पाटील आणि त्यांच्या वैद्यकीय टीमकडून सुंदरनगरमधील शंभरहुन अधिक महिलांचे कोव्हिडं लसीकरण केले आहे. साखर कारखाना आरोग्य केंद्र आणि जामवाडी आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण पार पडले. यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण, जमिर कुरणे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments