Daily Mahasatta

Daily Mahasatta

वांगी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु, उर्वरित पदे लवकरच भरणार : मंत्री विश्वजीत कदम


कडेगाव (सचिन मोहिते)
 वांगी (ता. कडेगाव) येथील प्राथमीक आरोग्य केंद्र  सुरू व्हावे हि ग्रामस्थाची अनेक वर्षाची मागणी होती. याचा सातत्याने दैनिक महासत्ताने पाठपुरावा केला होता. याला खऱ्या अर्थाने यश आले आहे असे म्हणावे लागेल . कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यानी प्रशासनास प्राथमिक आरोग्य केंद्र तातडिने सुरू करण्याचा आदेश दिल्यामुळे आरोग्य प्रशासनाने दखल घेऊन तातडीने दोन मेडिकल ऑफिसर यांची नियुक्ती करुन प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू केलेले आहे। सदर आरोग्य केंद्रात उर्वरित दहा ते बारा कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती  सांगली जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. पोरे यांनी दिलेली आहे . 

गावासाठी दिवंगत डाँ..पतंगराव कदम यांनी मंजूर केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्मीतीनंतर आरोग्य केंद्र सुरु होणार होते. परंतु  कोरोना महामारीमुळे  सुरु झाले नाही . नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरु करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री डाँ. विश्वजित कदम यांनी दिले असून बुधवार दिनांक २५ पासून हि आरोग्यसेवा सुरु झालेली आहे. दोन महिन्यापूर्वी पदनिर्मीतीस शासनाने मंजूरी दिली होती. मात्र याठिकाणी शासनाने "कोव्हिड  केंद्र" सुरु केले होते. ते महिन्यापूर्वी बंद झाले. आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था म्हणून जनतेच्या मागणीनुसार दैनिक  महासत्ताने वृत्त प्रसारित केले होते याची दखल घेत  ना..डाँ. विश्वजित कदम यांनी उदघाटन वगैरे सोपस्कार न करता तात्काळ हे आरोग्य केंद्र सुरु करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. आता दोन मेडिकल ऑफिसरची नियुक्ती करून आरोग्य केंद्र सुरु केले आहे. तसेच आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी याठिकाणी  वर्ग करण्यात आले आहेत. या आरोग्य केंद्राचा लाभ वांगीसह शिवणी , शेळकबाव , शिरगांव , अंबक ,रामापूर या गावांनाही होणार आसल्याने सर्वसामान्य जनतेत आनंदाचे वातावरण आहे .

Post a Comment

0 Comments