Daily Mahasatta

Daily Mahasatta

कट्टर विरोधक असलेले आ. सुधीर गाडगीळ आणि पृथ्वीराज पाटील आले एकत्र. आता पुढे काय ?

सांगली,( प्रतिनिधी)
सांगलीची राजकीय संस्कृती ही विरोधासाठी विरोध अशी नाही, त्यामुळेच उद्या सांगलीत होणाऱ्या पूर परिषदेसाठी आ. सुधीर गाडगीळ यांना थेट त्यांच्या कार्यालयात जाऊन काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी निमंत्रण दिले.

यासंदर्भात बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, ही पूर परिषद सांगली शहर आणि कृष्णाकाठच्या गावांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पूरप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सर्वपक्षीय धोरण आणि मदत आम्हाला आवश्यक वाटते. हा प्रश्न सगळ्यांचाच आहे, त्यामुळेच आम्ही खासदार संजयकाका पाटील आणि आमदार सुधीर गाडगीळ यांना परिषदेसाठी निमंत्रित केले आहे. या भूमिकेचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी स्वागत केले आहे. संजयकाका पाटील यांनीही परिषदेला येण्याचे मान्य केले आहे.

महापूराची कारणे आणि उपाय शोधण्यासाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने सांगलीत उद्या (शनिवार) दुपारी ४ वाजता डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स हॉलमधील पूर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेची सर्व तयारी पुर्ण झाली आहे.

कृष्णेसह अन्य नद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगली शहर आणि कृष्णाकाठच्या गावांचे प्रचंड नुकसान होते. त्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.  त्यासाठी या फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. परिषदेचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत, तर सहकार व कृषी राज्यमंत्री ना. विश्वजीत कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच भीमा खोरे पूर अभ्यास समितीचे अध्यक्ष तसेच २०१९ च्या पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचा अभ्यास करणाऱ्या वडनेरे समितीचे सदस्य व महाराष्ट्र शासनातील सेवानिवृत्त प्रधान सचिव राजेंद्र पवार, 'प्रोजेक्ट मेघदूत' अंतर्गत मान्सूनचा अभ्यास करणारे सेंटर फॉर सिटीजन सायन्सचे संचालक मयुरेश प्रभुणे, ज्येष्ठ पत्रकार, संपादक  वसंत भोसले, आभाळमाया फौउंडेशनचे संस्थापक, प्रख्यात आर्किटेक्ट प्रमोद चौगुले हे परिषदेत अभ्यासपूर्ण मते मांडणार आहेत. या परिषदेकडे सांगलीकरांचे लक्ष लागून राहिले आले आहे.
कोरोनाचे सर्व निकष पाळून ही परिषद घेण्यात येत आहे, तसेच ती ऑनलाईनही प्रसारित करण्यात येणार आहे.

--------

Post a Comment

0 Comments