Daily Mahasatta

Daily Mahasatta

डॉ. दिपक पाटील यांचे कार्य अभिमानास्पद : सुभाष पाटील

सांगली (प्रतिनिधी)
कोरोना काळामध्ये संजीवनी हॉस्पिटल च्या माध्यमातून डॉक्टर दीपक पाटील यांनी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना मोठा आधार दिला आहे. कोरोना रुग्णावर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा केली आहे. त्यांचे काम समाजाला अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील यांनी केले
   डॉ. दिपक पाटील यांचा वाढदिवस तसेच कोरोना रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा दिल्याबद्दल अशोका ॲग्रो उद्योग समुहाच्या वतीने वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
 


यावेळी संजीवनी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. स्वाती पाटील, डॉ. स्मिता पाटील, आनंदराव पाटील, सचिन पाटील, मोहन पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ जाधव उपस्थित होते. प्रारंभी डॉ. दिपक पाटील यांचा सत्कार सुभाष पाटील आणि अशोका ॲग्रोचे संस्थापक डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
 
यावेळी बोलताना सुभाष पाटील म्हणाले, डॉक्टर दीपक पाटील यांनी जिद्द ,चिकाटी व अपार कष्टाच्या जोरावर तसेच कुटुंबाची शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती नसताना देखील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्वप्नवत किंवा अशक्य वाटणारी डॉक्टर की ची पदवी स्वकर्तुत्वाने मिळवली. त्यांच्या या यशाचे सर्वांनाच मनापासून कौतुक आहे. त्यांनी गरीबी जवळून पाहिली आहे. शून्यातून विश्व निर्माण त्यांनी केलेले आहे त्यामुळे त्यांना गरीब, गरजू ,उपेक्षित लोकांचे दुःख माहित आहे. डॉक्टर की हा व्यवसाय नसून एक सेवा आहे, असे ते नेहमी वागतात त्यामुळे त्यांच्या रुग्णालयात होणाऱ्या उपचाराचे बिल हे गरिबाच्या खिशाला परवडणारे असते बिलासाठी त्यांनी कधीही कोणाचाही उपचार थांबवला नाही.  त्यांचे बोलणे व त्यांचा दानशूरपणा यामुळे रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांच्या मध्ये डॉक्टरांच्या विषयी एक वेगळाच आदर निर्माण झालेला आहे.
  
डॉक्टर सतीश पाटील म्हणाले, कोरोना संसर्गाने जनजीवन विस्कळित झाले आहे. कोरोनामुळे सामान्य माणसाचे जगणे हे मुश्किल बनले आहे.  कोरोनाच्या संकट काळामध्ये बोरपाडळे फाटा येथे असलेले डॉक्टर दीपक पाटील यांचे "संजीवनी हॉस्पिटल" म्हणजे गोरगरीब गरजू रुग्णांसाठी प्रचंड मोठा आधार आहे. या संजीवनी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड रुग्णांवरती 100% मोफत उपचार केले जातात. रुग्णांना सकाळचा नाष्टा, दोन वेळचे जेवण, त्यांना लागणारे सर्व औषधे, त्यांच्यावर केले जाणारे उपचार याचा एक रुपया देखील डॉक्टर दीपक पाटील हे घेत नाहीत. संजीवनी हॉस्पिटल म्हणजे आरोग्य मंदिर आणि डॉक्टर दीपक पाटील म्हणजे या मंदिरातली जणू देवच. अशी भावना त्या प्रत्येक बरा होऊन गेलेल्या रुग्णाची व त्याच्या नातेवाईकांची असते. डॉक्टर दीपक पाटील यांनी समाजसेवेची शिक्षण गंगा सर्वसामान्यांच्या दारी आणण्याचे  काम" डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज" तसेच" डॉक्टर दीपक पाटील बीएससी नर्सिंग कॉलेज" आणि" डॉक्टर दीपक पाटील जी एन एम कॉलेज" यासारख्या व्यावसायिक शिक्षण उपक्रमातून अव्याहतपणे चालू ठेवले आहे.

Post a Comment

0 Comments