Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिवसेना सत्तेत, तरी देखील आमदारांच्या पुत्राने दिला महावितरण कार्यालय फोडण्याचा इशारा


सांगली (प्रतिनिधी)
महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता गावोगावी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली असुन आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे. शेतकऱ्यांना 15 दिवसांची मुदत द्यावी अन्यथा महावितरणचे कार्यालय फोडू असा इशारा जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिला आहे
      याबाबत बाबर म्हणाले की एका बाजूला कोरोनाचा कहर वाढत आहे. अशावेळी शासन आणि प्रशासन नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करीत आहे. मात्र त्याचवेळी महावितरण कंपनीच्या कडुन  थकीत वीज बिलासाठी शेतकऱ्यांना कसलीही पूर्वसूचना न देता कनेक्शन तोडण्यात आली आहेत
       राज्यातील जनता अगोदरच कोरोनाच्या संसर्गजन्य साथीने हैराण आहे. अशात महावितरणच्या धोरणाने लोकांच्यात संताप निर्माण झाला आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महामारीमुळे शेतीपूरक उदयोग व्यवसायावर संकट आले आहे अशा परिस्थितीत वीज बिल माफ होणे अथवा त्यामध्ये सवलत मिळणे अपेक्षित होते परंतु याउलट कसलीही पुर्व सुचना न देता कनेक्शन कट करणे ही बाब अत्यंत चुकीची आहे याबाबत शेतकऱ्यांना पंधरा दिवसांची मुदतवाढ देऊन त्यामध्ये हप्ते पाडून द्यावेत व ज्यांची कनेक्शन तोडली आहेत त्यांनाही बील भरण्यासाठी पंधरा दिवसाचा अवधी मिळावा त्यासाठी त्यांची तोडलेली कनेक्शन पूर्ववत जोडुन मिळावीत अन्यथा पंधरा दिवसांनी महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल करू कार्यालय फोडू असा इशाराही बाबर यांनी दिला आहे.
      दरम्यान राज्यात शिवसेनेचे सरकार सत्तेत असताना, शिवसेनेचे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या
पुत्राने महावितरण ला खणखणीत इशारा दिल्यामुळे त्याची सांगली जिल्ह्यासह अन्यत्र जोरदार चर्चा सुरू आहे. सुहास बाबर यांच्या इशार्या नंतर महावितरणचे अधिकारी काय भूमिका घेतात? याकडे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments