Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली महापालिकेच्या विविध ऑनलाईन सेवांचा लवकरच शुभारंभ : महापौर दिग्विजय सुर्यवंशी


सांगली (प्रतिनिधी)
महापालिकेच्या विविध विभागांच्या थकबाकीचा दाखला , होर्डिंग्ज / जाहिरात परवानगी, थिएटर बुकींग, व विवाह नोंदणी या सेवा लवकरच ऑनलाईन करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे.

महापौर दिग्विजय सुर्यवंशी , सदर सेवांसाठी नागरीकांना महानगरपालिकेच्या विभागांमध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. सध्या कोव्हिड कालावधीमध्ये मनपाचे कर्मचारी यांना अतिरिक्त कामकाज करावे लागत आहे. त्यामुळे नागरीकांना महत्वाच्या सेवा देतांना वेळेचा अपव्यय होत आहे. याचा विचार करुन मनपा प्रशासनाकडून सन्मा. पदाधिकारी यांचेसमोर महत्वाच्या सेवांचे सादरकीरणाचे नियोजन केले होते. सदर सेवा नागरीकांना घरबसल्या प्राप्त करुन देण्यात येणार असून आजच्या सादरीकरणामध्ये पदाधिकारी यांनी नागरिकांना सेवा सुलभरित्या देणेकरिता प्रशासनास सूचना केल्या. त्या सूचनांचा विचार करुन लवकरच जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन करण्यात येत आहेत. प्रस्तावित सेवा मनपाच्या संगणक विभाग मार्फत तयार केल्या आहेत.

सदर सादरीकरण बैठकीस महापौर दिग्विजय सुर्यवंशी,  आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर श्री उमेश पाटील, स्थायी समिती सभापती श्री. पांडूरंग कोरे, मा.गटनेते (भाजप) श्री. विनायक सिहांसने, गटनेते (राष्ट्रवादी) श्री.मैनूद्दिन बागवान, अतिरिक्त आयुक्त श्री दत्तात्रय लांघी, उप आयुक्त श्री. राहूल रोकडे, सहाय्यक आयुक्त श्री अशोक कुंभार, व इतर अधिकारी उपस्थित होते. सदरील सादरीकरण व संपूर्ण माहिती मनपाचे सिस्टीम मॅनेजर श्री. नकुल जकाते, प्रोग्रामर श्री. अतूल बसरगी यांनी केले

Post a Comment

0 Comments