Daily Mahasatta

Daily Mahasatta

कायद्याच्या चाकोरीतून बैलगाडी शर्यतीचा मार्ग काढणार : मंत्री जयंतराव पाटील यांची ग्वाही


सांगली (प्रतिनिधी)
       खिलार बैलांची जात ही नामशेष होत चालली आहे. या बैलांच्या संवर्धनासाठी आपल्याला योग्य ती पावले उचलावी लागतील. त्याअनुषंगाने कायद्याच्या चाकोरीत बसवून बैलगाडा शर्यतीवर लवकरात लवकर मार्ग काढला जाईल, असे मत जलसंपदा मंत्री नाम. जयंतराव पाटील यांनी व्यक्ती केले आहे.

       बैलगाडा शर्यतीच्या प्रश्नी आज मंत्रालयाच्या आवारात शेतकरी बांधवांसह बैठक आयोजित करण्यात आली होती. शेतकरी बांधवांच्या भावनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या बैठकीला मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री श्री. सुनील केदार, गृहराज्यमंत्री श्री. सतेज बंटी पाटील, आ. किसन कथोरे, आ. अनिल बाबर, आ. शशिकांत शिंदे, आ. निलेश लंके, आ. संग्राम जगताप आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. 

यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार म्हणाले राज्याला बैलगाडा शर्यतीची प्राचीन संस्कृती लाभलेल्या हे पारंपारिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यती कडे पाहिले जाते बैलगाडा शर्यतीचे आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते याकरिता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरू करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री सुनील केदार यांनी दिली.

यावेळी आमदार अनिलभाऊ बाबर यांनी शेतकर्‍यांच्या वतीने आपली भूमिका मांडली. आमदार बाबर म्हणाले खिलार जातीच्या गाय बैलांची उपज आणि संगोपन सर्वाधिक होते ते माझ्या खानापूर मतदारसंघात. माझ्या मतदारसंघातील आटपाडी तालुक्यातील खरसुंडी आणि करगणी येथे वर्षातून दोन वेळा सर्वात मोठे बैल बाजार भरतात. या बाजार साठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू या चार राज्यातून लोक येत असतात. तसेच विटा शहरात देखील जनावरांचा राज्यातील सर्वात मोठा बाजार भरतो होता. मात्र या बाजारात आता एक ही बैल विक्रीसाठी येत नाही, ही वास्तवता आहे.
      आमदार बाबर म्हणाले, शासनाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला धक्का न लावता यावर लवकरात लवकर तोडगा काढावा. तसेच बैलगाडा शर्यतीसाठी सरावाची आवश्यकता असते. बैलगाड्यांचा सराव सुरू राहिल्यास त्यांचे संगोपन, खुराक याची देखील विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे शासनाने बैलगाड्यांचा सरावाच्या दृष्टीने परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार अनिल भाऊ बाबर यांनी केली.

Post a Comment

0 Comments