Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत कोरोनाची रुग्णसंख्या घटली, मात्र मृत्यूचे तांडव सुरूच


सांगली (प्रतिनिधी)
सांगली जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे आज सोमवार तारीख २३ रोजी ४२६ रुग्णांचा कोरणा चाचणी अहवाल पॉझिटिव आला आहे. मात्र आज एकाच दिवशी २३ रुग्णांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. एका बाजूला कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात येत असताना मृत्यूचा आकडा चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे.
       सांगली जिल्ह्यात गेले महिन्याभरात रुग्ण संख्या आटोक्यात आल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. आता  प्रति दिन पाचशेहून कमी रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. रुग्ण संख्या घटल्यामुळे प्रशासनाने देखील सुटकेचा निश्वास सोडला आहे मात्र जिल्ह्यात अजूनही कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णाच्या संख्येत अपेक्षित घट झाली नाही. सांगली जिल्ह्यातील १८  तर अन्य जिल्ह्यातील ५ अशा एकूण २३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, यामध्ये सर्वाधिक खानापूर तालुक्‍यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना बळींचा वाढता आकडा निश्चितच प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे.

Post a Comment

0 Comments