Daily Mahasatta

Daily Mahasatta

पँथरचे अध्यक्ष केदार यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

: जत पँथरच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

जत (सोमनिंग कोळी)
: ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या गाडीवर मु.पो. सेलू जिल्हा परभणी येथे काही समाजविघातक प्रवृत्ती कडून गाडीवर दगडफेक करून जीवघेणे हल्ला करण्यात आला. या घटनेचा निषेध आरोपींना तत्काळ अटक करावी, दीपक केदार यांना पोलीस संरक्षण देण्यात द्यावे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत या मागण्यासाठी पँथर सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष भूपेंद्र कांबळे यांनी जत तहसीलदार यांना निवेदन दिले.

यावेळी तालुका अध्यक्ष अमर कांबळे ,उपाध्यक्ष गिरीश सर्जे,विकी वाघमारे,सुनिल कांबळे, प्रमोद काटे,विक्रांत कांबळे,राहुल वाघमारे, राहुल ऐवाळे ,उमेश कांबळे,सुनिल साबळे वैभव गंगणे,सुशांत बाबर आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की या भ्याड हल्ल्यात गाडीमधील भीमराज गोटे हा कार्यकर्ते जखमी झाला आहेत. पोलिसांना वारंवार फोन करून सुद्धा पोलिसांनी घटनास्थळी येण्यास विलंब केला.दीपक केदार हे दि.३०.०७.२०२१ रोजी दिवसभर गंगाखेड, पालम, माजलगाव असा दौरा करून रात्री सुमारास १० वाजता सेलूला मुक्कामासाठी त्यांच्या कार्यकर्त्यासोबत आले होते. सेलू स्थित येथे एका हॉटेलकडे गाडी नेली. आधीच पाळीत ठेवून असणाऱ्या समाजकंटकाच्या हातात कोयता, असे हत्यारे होते.

या समाजकंटाकानी त्यांच्या हातातील दगड दीपकभाई केदार यांच्या गाडीवर फेकण्यात आले, भ्याड जीवघेणे हल्ला करण्यात आला. राज्यातील जातीय अत्याचार बाबत भूमिका, सामाजिक, आर्थिक, सांकृतिक, शैक्षणिक प्रश्नाबाबत दीपक केदार हे सतत आवाज उठवत असतात. त्यांचा हा आवाज दाबण्याचा प्रयत्न काही मनुवादी विचारसरणीच्या लोकांकडून होताना दिसत आहे. तरी या विषयाची सखोल चौकशी होऊन आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे. या मागणीचे निवेदन जत तहसीलदार यांना देण्यात आले.

Post a Comment

0 Comments