Daily Mahasatta

Daily Mahasatta

मंत्री विश्वजीत कदम यांना मोठा धक्का, दिग्गज नेत्यांनी ठोकला रामराम

कडेगांव (सचिन मोहिते)

कडेगाव पलूस मतदारसंघ हा  कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांचा बालेकिल्ला. परंतु याच बालेकिल्यात कडेगाव शहरात काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविकेसह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केल्याने मंत्री डॉ विश्वजीत कदम यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

 जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयंत पाटील साहेब, आम. अरुण  लाड व युवा नेते शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली व  कडेगाव तालुका अध्यक्ष जयदीप (काका)यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कडेगावच्या विद्यमान नगरसेविका तसेच कडेगाव नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा सौ. निता संदीप देसाई यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये कडेगाव चे माजी सरपंच माधवराव शंकरराव देशमुख, माजी उपसरपंच रंगराव शंकरराव देशमुख, संघर्ष ग्रुप चे अध्यक्ष संदीप काटकर, गोसावी समाज तालुका अध्यक्ष किरण चव्हाण, बेलदार समाजाचे  तालुका अध्यक्ष संभाजी चव्हाण, माजी पोलिस अधिकारी अनंत देशमुख, नाथा गुरव, दादासो बेल्लम, विजय माळी, अमोल महाडिक, सुनील कवळे, गणेश दोडके, विकी पवार, रोहित शिंदे, रवी चव्हाण, दीपक चव्हाण, सागर चव्हाण, अमित चव्हाण, सुनील चव्हाण,दशरथ चव्हाण,प्रेम चव्हाण,मोहन जाधव, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सोहळा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय कडेगाव या ठिकाणी रविवार दिनांक १५ ऑगष्ट २०२१ रोजी  पार पडला. या पक्षप्रवेश कार्यक्रमला कडेगाव तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments