Daily Mahasatta

Daily Mahasatta

मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या कार्याला राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या शुभेच्छा


सांगली (प्रतिनिधी)
सांगलीतील मदनी चॅरिटेबल ट्रस्टने कोरोनाच्या कालावधीत केलेल्या सामाजिक कार्याची दखल राज्यपाल श्री भगतसिंह कोशारी यांनी घेतली आहे आणि संस्थेला या कार्याबद्दल शुभेच्छा पत्रक घोषित केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत देण्यात आलेली आहे.

 कोविडच्या कालावधीत मदनी चॅरिटेबल ट्रस्टने जीवनावश्यक वस्तूचे वाटप, अपंगांना दिलासा, महापूर काळात पुरबाधित ग्रस्तांना केलेली मदत तसेच सर्व जातीधर्मीय मृतदेहाचे अत्यंसंस्कार करून  सामाजिक ऐक्य वृद्धिंगत केलं. कोरोनाच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन  जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी या ट्रस्टने केलेल्या कामाचा अहवाल शासनाकडे पाठवल्या नंतर  राज्यपाल श्री भगतसिंह कोशारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र पाठवण्यात आल्यानंतर मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, महासचिव सुफियांन पठाण यांना जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत या शुभेच्छा पत्राची माहीती देण्यात आली तसेच मदनी ट्रस्टने केलेल्या कामाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाने सुद्धा अभिनंदन केले आहे, अशी माहिती अध्यक्ष हाफिज सदाम सय्यद (महासचिव सुफियान पठाण) यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments