Daily Mahasatta

Daily Mahasatta

कडेगावात विकास कामांच्या उदघाटनाचा धडका


: राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते विविध विकास कामाचा उदघाटन सोहळा संपन्न.

कडेगाव (प्रतिनिधी)
  कडेगावमध्ये विकास कामांचे आयोजन असुन विविध पक्षांच्यावतीने  विकास कामांच्या उदघाटनाचा धडका सुरु आहे. महाराष्ट्र राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री नामदार विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांच्या हस्ते कडेगाव नगरपंचायतीच्या विविध प्रभागातील विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळे संपन्न झाले. यावेळी प्रभाग क्रमांक चार मध्ये सांगली जिल्हा बँक ते चावडी चौक अंडरग्राउंड गटार,व रस्ता कॉंक्रिटीकरण, डॉ.पतंगराव कदम पतसंस्था शेजारील रस्त्यावर पेव्हिग ब्लॉक बसविणे, व जिल्हा बँकेच्या बुरुज चौकांमध्ये हायमास्ट लॅम्प इत्यादी विकास कामांचे उद्घाटन व भूमीपुजन सोहळ संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळा प्रसंगी सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन शांताराम कदम ,  कडेगावचे ज्येष्ठ नेते गुलामहुसेन पाटील, सुरेश निर्मळ, दीपक भोसले, कडेगावच्या नगराध्यक्षा.सौ.संगिता राऊत, उपनगराध्यक्ष दिनकर जाधव, मा.उपनगराध्यक्ष नगरसेवक.साजीद पाटील, सागर सूर्यवंशी, सुनिल पवार, नगरसेविका.सौ. रिजवाना मुल्ला, सौ.संगीता जाधव,नाशिर पटेल,असिफ तांबोळी,शीराज पटेल,इम्रान पटेल, लतिफ पटेल, इजाज तांबोळी,आरमान पटेल,एजाज पटेल व कडेगाव शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments