Daily Mahasatta

Daily Mahasatta

कर्मवीर पतसंस्थेत सभासदांच्या उन्नतीसाठी अनेक योजना कार्यान्वित : रावसाहेब पाटील


३४ वी वार्षिक सभा संपन्न :१३% ने लाभांश जाहीर

सांगली (प्रतिनिधी)
सांगली कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली ची सन २०२० २०२१ सालची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली त्यामध्ये आर्थिक वर्ष २०२० २०२१ साठी सभासदांना १३ टक्के ने लाभांश देण्याची घोषणा संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केली. संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कर्मवीर पतसंस्थेचा परिवार आता ५ लाख लोकांचा झाला असून संस्थेवरील सभासदांना विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. संस्थेने आर्थिक बाबतीत उल्लेखनिय काम केले आहे. सभासदांच्या उन्नतीसाठी अनेक योजना नव्याने कार्यान्वीत केल्या असून भविष्यासाठी मोठे संकल्प संस्थेने केल्याचे त्यांनी सांगितले.

सभेची सुरुवात संस्थेचे श्रध्दास्थान कर्मवीर भाऊराव पाटील व स्व. डॉ. आप्पासाहेब चोपडे यांची प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलनाने झाली. संचालक श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले यांनी दिवंगतांना श्रद्धांजलीचा ठराव मांडला.

कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर संस्थेची सभा ऑनलाईन यु ट्युब फेसबुक च्या माध्यमातून घेण्यात आली. सभेला सभासदांचा चांगला प्रतिसाद लाभला. सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. १३ टक्के ने लाभांश दिल्यामूळे सभासदांना लाभांशाच्या रुपाने रुपये २ कोटी ६७ लाखापेक्षा अधिक रक्कम सभासदांच्या सेव्हींग खात्यास लगेचच वर्ग करण्यात आली.

. सन २०२० २०२१ या आर्थिक वर्षाच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब (जिनगोंडा) पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात घेतला अहवाल सालात संस्थेला ६ कोटी ५० लाखाचा निव्वळ नफा झाला. संस्थेचा एकत्रित व्यवसाय १०० कोटीचा झाला आहे. स्वनिधी ५२ कोटी ८३ लाख असून, ठेवी ५५६ कोटी ५० लाख आहेत. विविध बँकेमध्ये गुंतवणूक रु. १८३ कोटी ६६ लाखाची आहे. संस्थेने रु. ४१९ कोटी ८६ लाखाचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेचा नेट एन्. पी. ए. आहे. संस्था ५० शाखांच्या माध्यमातून सभासदांना सेवा देत आहे. आर्थिक सेवेबरोबर संस्था सामाजिक कार्यातही सदैव पुढे असल्याचे त्यांनी सांगितले,

सभासदांच्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देतानाच पुढील वर्षी संस्थेचे मुख्यालय उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेवू व त्यानिमित्त सभासदांना अभिमान वाटेल असा वाढीव लाभांश देण्याची व सेवकांच्या वेतन वाढीची घोषणा त्यांनी केली. सभेच्या विषय पत्रिकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदुम यांनी केले. सर्व विषय सभासदांनी एक मताने मंजूर केले. कर्मवीर पतसंस्थेचे कामकाज अतिशय उत्तम सुरु असून ही प्रगती अशीच सुरु राहावी अशा शुभेच्छा अनेक सभासदांनी दिल्या.

आभार संस्थेचे संचालक अँड. एस. पी. मगदूम यांनी मानले. सभेस व्हाईस चेअरमन श्रीमती भारती चौपडे संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे. डॉ. रमेश वसंतराव ढवू श्री. लालासो भाऊसो थोटे, श्री. अ.के. चौगुले (नाना) सौ. ललिता अशोक सकळे श्री आप्पासो गवळी श्री. बजरंग माळी तज्ञ संचालक डॉ. एस.बी पाटील (मोटके ), श्री गुळाप्पा शिरगेरी इ. उपस्थित होते. सुत्र संचलन संजय सासणे यांनी केले.

Post a Comment

0 Comments