Daily Mahasatta

Daily Mahasatta

महापुराचे संकट पाहता नवा गुंठेवारी कायदा नको : - पृथ्वीराज पाटील

सांगली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी सूचना मांडल्या.

सांगली,( प्रतिनिधी ) 
सांगली शहरातील सध्याच्या महापूर परिस्थितीचा विचार करता येथे गुंठेवारी कायद्याला मुदतवाढ देऊ नये अशी सूचना सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने मुंबईत  घेतलेल्या  जिल्हा अध्यक्ष, आमदार, सर्व सेल आणि विभाग प्रमुखांच्या बैठकीत सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्याचा आढावा पृथ्वीराज पाटील यांनी मांडला. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले हे होते.

यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी सुचविले की, कृष्णा नदीच्या महापुरामुळे सध्या सांगली शहर वेढले गेले आहे. अशा परिस्थितीत गुंठेवारी कायद्याला मुदतवाढ दिल्यास शहराचे आणखी विद्रुपीकरण वाढेल. त्यामुळे या कायद्याला मुदतवाढ देऊ नये. महापुरात नुकसान झालेल्या लोकांना २०१९ ला दिली होती, त्याहीपेक्षा जास्त मदत सरकारने तातडीने द्यावी. यासंदर्भात संबंधित मंत्र्यांशी बोलून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे श्री. पटोले यांनी सांगितले.
       बैठकीला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सोनल पटेल, आशिष दुआ, वामसी रेड्डी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आदी उपस्थित होते.
-----

Post a Comment

0 Comments