Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत पूरग्रस्तांना ' महामदत अभियान, ' जीवनावश्यक वस्तूच्या जम्बो किटचे वाटप


जमियत उलेमा ए हिंदचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती सादिक पटेल, मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुफियांन पठाण यांच्यासह  टीमने पुराने बाधित झालेल्या भागांतील नागरिकांचा सर्व्हे करून जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप केले.


सांगली (प्रतिनिधी)
नैसर्गिक आपत्तीत नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या जमियत उलेमा ए - हिंद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टने सांगलीत पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यासाठी मदत महाअभियान राबवले. सांगलीत जिल्ह्यात कृष्णा नदीला आलेल्या महापुरात सर्वसामान्य गरीब आणि अपंग कुटूंबाची वाताहत झाली. या पूरग्रस्त कुटूंबाना सांगलीत इमॉन्यूएल शाळेच्या मैदानावर एक हजार कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट मदत म्हणून देण्यात आले. 


सांगली परिसरातील पद्माळ, कर्नाळ, शामराव नगर दत्त नगर काका नगर सांगली वाडी अशा भागातील पुरग्रस्तांना हे किट वाटप करण्यात आले. मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि जमियत उलेमा ए- हिंद या दोन्ही संस्थानी पुरग्रस्त कुटूंबाना मदत पोहोचवायला प्रारंभ केला आहे. मदतीच्या १२ व्या दिवशी सांगली आणि आसपासच्या परिसरातील पुरग्रस्तांना एक हजार किट देत महामदत अभियान राबवले. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी योग्य नियोजन करत सोशल डिस्टनसिंग चे पालन करत मदतीचे वाटप केले. दिव्यांग कुटूंबाना देखील मदत देण्यात आली. जमियत उलेमा ए हिंदचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती सादिक पटेल, मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुफियांन पठाण यांच्यासह  टीमने पुराने बाधित झालेल्या भागांतील नागरिकांचा सर्व्हे करून जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप दिले.जवळपास शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी योग्य नियोजन करून मदत दिली यावेळी प्रांतअधिकारी समीर शिंगटे यांचे प्रतिनिधी म्हणून मंडल अधिकारी श्रीकांत घुळी तलाठी हंगे उपस्थित होते. घुळी यांनी या कार्याचे कौतुक केले.

सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी मदत या दोन्ही संस्थेने दिली असल्याचे सांगितले, दिव्यांग कुटूंबाना मदत वाटपाच्या प्रसंगी सामजिक कार्यकर्त्या रेखा पाटील उपस्थित होत्या सलग 12 दिवस मदत पोहोचविण्यासाठी या दोन्ही संस्था काम करत असल्याचे आपण पाहिले आहे. सांगली जिल्ह्यातील नेते,  मंत्री ,आमदार खासदार किंबहुना प्रशासनही अजून मदत देण्यात मागे आहे पण या दोन्ही संस्थानी दिलेली मदत ही नेतेगिरी करणाऱ्याना उघडे पाडणारी आहे असं परखड मत व्यक्त करत पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करतांना संसार उपयोगी साहित्य आणि रोख मदत देण्याचे कामही केले असल्याचे आवर्जून सांगितले. भर पावसात ही मदत देताना दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी वृद्धांना स्वतः चिखलातून वाट काढत मदत दिली. या मदतीच्या उपक्रमा बद्दल पुरग्रस्तांनी समाधान व्यक्त केले. जात पात धर्म न पहाता मदत करण्याचे काम केले जात असल्याचे मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुफियांन पठाण यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments