Daily Mahasatta

Daily Mahasatta

पेठच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे शिष्यवृत्ती परिक्षेत


पेठ(रियाज मुल्ला)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवतीने इयत्ता आठवीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत  कासेगांव एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पेठ मधील वेदांत निर्मलकुमार जाधव व सृष्टी राजू देशमाने या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
   वेदांत निर्मलकुमार जाधव याने 180 पैकी 95 तर सृष्टी राजू देशमाने हीने 180 पैकी 101 गुण मिळविले. सदर विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी पर्यंत दरसाल 12,000 रुपये (इयत्ता बारावी पर्यंत एकूण 48 हजार रुपये) शिष्यवृत्ती मिळणार आहे. विद्यालयातून एकूण 22 विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
     यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक जे.पी. पाटील, विभाग प्रमुख ए.टी.कांबळे व सर्व शिक्षक- शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन कासेगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शामराव पाटील, सचिव आर.डी.सावंत, सहसचिव राजेंद्र कुरळपकर, अधीक्षक ए.डी.पाटील, पर्यवेक्षक एस.एल.माने,एस.एम.पवार, मुख्याध्यापक जे.पी. पाटील, कार्याध्यक्ष एन.डी.पाटील, उपकार्याध्यक्षा व्ही.आर.माळी, जे.आर.कदम, आर.पी.पवार, डी.एच.कुंभार, बी.डी.जाधव,ए.एच. पाटील, एम.व्ही.भोपळे, ए.पी.ढवळीकर, एस.आर.बनसोडे, व्ही.बी.बंडगर, एन.एस.काळे, ए.आर.पाटील, रणजीत पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments