Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोल्हापूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच दिवशी सहा ठिकाणी घरफोड्या


कोल्हापूर (पांडुरंग दळवी)
कोल्हापूर शहरासह उपनगरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी रात्री संभाजीनगर, रेसकोर्स नाका, रुईकर कॉलनी , नागाळा पार्क येथे  एकाच दिवशी सहा ठिकाणी बंद घरांचे कडीकोयंडा तोडून घरातील सोन्या -चांदीचे दागिणे, रोख रक्कम , टीव्ही अस लाखों साहित्य लंपास केला. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान नागाळा पार्क येथील सिरामिकच्या गोडाऊनचे शटर तोडून चोरट्यांनी सुमारे ७ लाख रुपये किमतीचे साहित्य लंपास केले. याची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली आहे, चोरीचे प्रकार घडलेल्या परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांकडून गस्त घालणे बंद केले आहे. पुन्हा गस्त घालावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


घटनास्थळावरून व पोलिसांकडून समजलेली माहिती अशी,  ओम गणेश कॉलनी येथे  नवनीत  आनंदराव काशीद हे कुटूंबियांसोबत राहतात. दोन मजली घरातील खालच्या मजल्याला कूलूप लावून. रात्री ते सर्व दुसऱ्या मजल्यावरील बेडरूम मध्ये झोपले होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्‍या सुमारास चोरट्यांनी तळमजल्‍यावरील हॉलचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. शोकेसमधील साहित्‍य विस्‍कटल. बेडरुममधील तिजोरी उचकटून २ तोळे वजनाच्‍या सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळी, चांदीच्या वस्तू आणि ५ हजाराची रोकड असा सुमारे लाखांचा ऐवज चोरून नेला.त्याच कॉलनीत उमेश नामदेव खटावकर यांच्या कौलारू घराला चोरट्यांनी लक्ष्य केल. मात्र इथं कोणीही राहत नसल्‍याने चोरट्यांच्‍या हाती काहीही लागले नाही.

      दरम्यान गजानन महाराज नगरातील स्‍वाती रेसिडेन्‍सीमधील बंद बंगला चोरट्यांनी फोडला .सचिन नरुले हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्यान कामानिमित्त ते पुण्‍यात राहतात. कुंटूबियांसह ते दर १५ दिवसांनी  कोल्‍हापुरात येतात. त्यांचा दरवजाचे गेट तोडून  तळमजल्यावरील एलईडी टीव्‍ही आणि चांदीचा करंडा चोरट्यांनी चोरून नेला. तर शिवराई कॉलनीतील रावसाहेब अप्पासाहेब पाटील हे देखील पुण्‍यात मुलाकडे  रहायला गेले आहेत. त्‍यांच्‍या घरालाही चोरटयांनी लक्ष्य करून दरवाजाच कूलूप तोडून टीव्‍ही चोरुन नेला. सकाळी चोरीच्या घटना उघडकीस आल्‍यानंतर जुना राजवाडा पोलिसांना माहिती मिळाली. पोलीसांनी घटनास्‍थळी पाहणी करुन पंचनामे केले. ठसे तज्ज्ञ, श्‍वान पथकालाही पाचारण करण्‍यात आल होते.गजानन महाराज नगरातील महिला वसतिगृहाच्या परिसरातील सीसीटीव्‍ही कॅमेर्‍यात संशयितांचे व्हिडीओ फुटेज पोलिसांना मिळाले आहे. तिघा संशयित चोरट्यांच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. राजवाडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

     दरम्यान, रुईकर कॉलनी युनिक पार्क येथे चौगुले कुटुंब राहते. यांच्या बंद घराचा कडीकोयंडा चोरट्याने उचकटून आत प्रवेश घरातील डीव्हीआर मशीन, एलईडी टीव्ही, सीडी प्लेअर, कुलर, पितळेच्या घागरी, टेबल फॅन, दोन सिलिंडर, डबे, ताट, वाट्या, पाण्याचा गंज, नळ, पितळी मूर्ती असा २५ हजार ६४० रूपयांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार १५ जुलै ते १६ ऑगस्ट या दरम्यान घडला. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. नागाळा पार्क येथील चंदवाणी सिरॅमिकचे गोडावून आहे. या गोडावूनच्या शटरचे कुलूप चोरट्याने उचकटून त्यातील वेगवेगळ्या आणि अत्याधुनिक पद्धतीचे नळ, मिक्सर शॉवर, बेसीन असा ७ लाख १३ हजार २७२ रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.

Post a Comment

0 Comments