Daily Mahasatta

Daily Mahasatta

मौजमजेसाठी दुचाकी, कार चोरी,कोल्हापुरात चौघेजण जेरबंद


कोल्हापूर  (प्रतिनिधी)
मौजमजेसाठी दुचाकी, कार चोरी करणाऱ्या चौघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून १४ व घरफोडीचा १ असे १५ गुन्हे उघडकीस आले असून ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उचगाव ता.करवीर येथे हि कारवाई केली.  संशयिताना १८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सचिन शिवाजी आगलावे ( वय २१ ), राहुल उमेश चौधरी ( वय २६, दोघेही रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर) ऋषिकेश कृष्णात कुकडे ( वय २१, ) दीपक आनंदा सूर्यवंशी (वय २२, दोघेही रा. कसबा तारळे, राधानगरी ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

    लॉकडाऊनच्या कालावधीत  कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात दुचाकी व चारचाकी वाहन चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली होती. वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील सर्वच प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून चोरट्यांचा शोध सुरु केला. या पथकातील पोलीस नाईक तुकाराम राजीगरे, संदीप कुंभार यांना सराईत चोरटा सचिन आगलावे व त्याचा साथीदार हे दोघे १३ ऑगस्ट रोजी चोरीची कार विक्रीसाठी उचगाव ता. करवीर इथल्या आशीर्वाद बंगल्याजवळ  येणार आहेत अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस हावलदार सुनील कवळेकर, पांडुरंग पाटील, संजय पडवळ , नितीन चौथे, महेश गवळी यांनी त्या ठिकाणी सापळा लावून, संशयित सचिन आगलावे, राहुल चौघारी, ऋषिकेश कुकडे, दीपक सूर्यवंशी या चौघांना ताब्यात घेऊन, त्यांचाकडे अधिक चौकशी केली असता, गांधीनगर येथे कार चोरी केल्याचे समोर आले. आगलावे व चौधरी यांनी २ तर कुकडे व सूर्यवंशी यांच्याकडून १० अशा ३ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या १२  दुचाकी पोलिसांनी  हस्तगत केल्या आहेत. वाहनाची चोरी करून, ती विक्री करायची व येणाऱ्या पैशातून मौजमजा करायची. अशी माहिती समोर आली. संशयिताना न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना १८ ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

या ठिकाणी गुन्हे दाखल : 
गांधीनगर २ , शिरोली एमआयडीसी २  , करवीर ३. जुना राजवाडा १ , लक्ष्मीपुरी १, राजारामपुरी २ , राधानगरी २ , कागल -२,

Post a Comment

0 Comments