Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत मातेने बस मध्येच दिला बाळाला जन्म

कुपवाड (प्रमोद अथनिकर)

मिरज तालुक्यातील भोसे येथे एका मातेने बसमध्येच  बाळाला जन्म दिल्याची घटना आज मंगळवार ता.१० रोजी घडली. यावेळी जत आगाराचे चालक, वाहक आणि सह प्रवाशांनी प्रसंगावधान राखून महिलेला मदत केली.

आज सकाळी जत - सांगली - कोल्हापुर ही बस  जतहून कोल्हापूरकडे रवाना झाली. या बस मध्ये जत मधील गोंधळेवडी येथील महिला दवाखान्यात जाण्यास चढली. सदरची बस कवठेमहांकाळच्या पुढे आल्या नंतर वनिता गळवी यांच्या अचानक पोटात दुखू लागले. या महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्या चे पाहून बसमधील महिला मदतीसाठी पुढे आल्या. धावती बस रस्त्याच्या कडेला थांबवून या महिलेची प्रसुती करण्यात आली आणि वनिता यांनी गोंडस बाळाला जन्म दिला.

त्यानंतर वनिता यांना घेऊन बसमधील प्रवासी आणि बसचे चालक वाहक यांनी पुढे असणाऱ्या भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. बाळ आणि आई दोघांची तब्बेत चांगली आहे. यानंतर प्रसंगावधान राखून महिलेला मदत करणाऱ्या  चालक बी. टी. माने आणि वाहक एस. एस. चव्हाण यांचा
जत आगाराचे व्यवस्थापक यांनी सत्कार केला आहे.

अकरावीची प्रवेश परीक्षा रद्द, राज्य सरकारला मोठा धक्का

Post a Comment

0 Comments