Daily Mahasatta

Daily Mahasatta

जाडरबोबलाद गटात सर्वाधिक निधी : तम्मन्नागौडा रवि पाटील

 जत, (सोमनिंग कोळी)

: माजी आमदार विलासराव जगताप  व माजी शिक्षण सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तम्मन्नागौडा रविपाटील यांच्या हस्ते जत तालुक्यातील जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटातील जाडरबोंबलाद ते उटगी सात किमीमिटर रस्ता, जा.बोबलाद ते शिरनांदगी रस्ता, जा.बोंबलाद ते महंमदबाद रस्ता,पडोळकरवाडी ते लकडेवाडी रस्ता,उटगी जि. मार्ग क्र २११ दहा किमी रस्ता, जिल्हा वार्षिक नियोजन मधून अंकलगी येथे जिल्हा परिषद मुलीची शाळेच्या तीन खोल्याचे बांधकामाचा उदघाटन करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती उपसभापती विष्णु चव्हाण, जा.बोबलादचे सरपंच धानमा ईश्वराप्प्पा रवि पाटील , उपसरपंच प्रकाश काटे, बजरंग होकळे , ग्रामपंचायत सदस्य भारत सूर्यवंशी,श्रीशैल जमखंडी,रामनिग निवर्गी,आप्पासाहेब मलाबादी चिदानंद ऐवळे.सोन्याळचे सरपंच जक्काप्पा निवर्गि, विजयकुमार बगली, सिद्धाप्पा मुचडी,तंटामुक्त अध्यक्ष  विठठ्लगौडा बिरादर गावातील ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मा.सभापती रवि पाटील म्हणाले माजी आमदार विलासराव जगताप यांनी मागील पंचवार्षिक मध्ये तालुक्यात भरगोस निधी आणले आहेत. मी स्वतः सांगली जिल्ह्याच्या शिक्षण सभापती पदी असताना सर्वाधिक निधी जत तालुक्यात आणला आहे. जा.बोबलाद जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी डीपीडीसी व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देण्याबरोबर आगामी काळात तालुक्यातील प्रश्नासाठी माझे सर्वोतोपरी पर्यत प्रयत्न राहील असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments