Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात चोरी, चार लाखांचा ऐवज लंपास


कुपवाड (प्रमोद अथनिकर)
   कुपवाड मधील लिंगायत गल्ली मध्ये अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून ४ लाख २४ हजार इतक्या रक्कमेचे सोने व रोख रक्कम  चोरी केल्याची घटना घडली आहे. 
    पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार कुपवाड परिसरातील लिंगायत गल्ली येथे राहणारे  संजय धुळाप्पा कुरुंदवाडे वय ५३ रा.महादेव मंदीराजवळ कुपवाड ता.मिरज जि.सांगली हे  कुटूंबासह बाहेर गावी गेले होते. घरा मध्ये कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घराचे कुलुप  तोडून तिजोरीतील  सोन्याचे बिल्वर चिट,
 वेढण्याची सोन्याच्या अंगठया, सोन्याचा पोहे हार , सोन्याचा नेकलेस ,कानातील सोन्याचे बास्केट रिंग ,सोन्याचे झुबे  ,दोन नाणी व प्लेन एक बिस्कीट व मंगळसुत्र यासह रोख रक्कम ४ हजार असा एकूण ४ लाख २४ हजार इतक्या किमतीचे सोने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे घटना घडली आहे.
    

Post a Comment

0 Comments