Daily Mahasatta

Daily Mahasatta

बानुरगडला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे


सांगली (प्रतिनिधी)
स्वराज्याचे शिलेदार बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळा च्या विकासासाठी लागेल तितका निधी देणार असून बानुरगड ला चांगल्या दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार आहोत, अशी ग्वाही पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिली.

जिल्हा प्रमुख संजय विभुते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बानुरगड येथील बहिर्जी नाईक यांच्या पवित्र स्मृती स्थळासाठी आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य  ठाकरे  यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपये सुशोभीकरणासाठी मंजूर झालेले आहेत. परंतु अजून त्यासाठी अतिरिक्त पाच कोटी रुपयांचा निधी द्यावा आणि त्याच्या कामाचा शुभारंभ आदित्य साहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते व्हावा, यासाठी त्यांना विनंती करण्यासाठी आज सह्याद्री गेस्ट हाउस या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

या वेळी लवकरच सांगली जिल्ह्याला भेट देऊन  समाधीस्थळाचे पाहणी करणार असल्याचे आदित्य साहेब ठाकरे यांनी सांगितले तसेच बहिर्जी नाईक यांचे समाधीस्थळास लागेल तितका विकास निधी
देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.   महाराष्ट्रातील तमाम रामोशी बांधवांचे प्रेरणास्थान असलेला हा गड त्याला चांगल्या दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करू असे आश्वासन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

Post a Comment

0 Comments