Daily Mahasatta

Daily Mahasatta

माझ्या विजयात आबांचा वाटा मोठा : आमदार मानसिंगराव नाईक

पेठ (ता. वाळवा) येथे झालेल्या रक्तादान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार मानसिंगराव नाईक. व्यसपीठावर इतर मान्यवर व समोर उपस्थित.

पेठ ( रियाज मुल्ला)
2009 च्या विधानसभा निवडणूकीत माझ्या विजयासाठी कै. रमेशआबा पाटील यांनी पेठ व परिसरातून मला मोठी ताकद दिली होती. माझ्या विजयात मोलाचा वाटा होता. समाजोपयोगी उपक्रम राबवून कै. रमेश आबांच्या स्मृती जतन केल्या जात आहेत, ही अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
    

पेठ (ता. वाळवा) येथे स्वातंत्र्यदिन व कै. रमेशआबा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील राजस्फूर्ती नवरात्रोत्सव मंडळ व शंभूराजे ग्रुप मार्फत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, 2009 च्या विधानसभा निवडणूकीत माझ्या विजयासाठी कै. रमेशआबा पाटील यांनी पेठ व परिसरातून मला मोठी ताकद दिली होती. माझ्या विजयात मोलाचा वाटा होता. आज जरी ते आपल्यात नसले, तरी त्यांच्या स्मृती कायम लक्षात राहतील. राजस्फूती मंडळ व शंभूराजे ग्रपने सामाजीक उपक्रम राबवून आबांच्या स्मृतिंना उजाळा देण्याचेच काम केले आहे. 


यावेळी शरद पाटील, राहुल पाटील, रोहित पाटील, डॉ. अभिराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय पाटील, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक नामदेव कदम, माजी संचालक फिरोज ढगे, रामोशी समाजाचे अध्यक्ष मोहनराव मदने, माजी सरपंच विजय पाटील, शिवाजी खापे, आत्मशक्ती पतसंस्थाचे अध्यक्ष हंबीरराव पाटील, भागवत पाटील, हेमंत देसाई, शाहूराज पाटील, संग्राम वारके, आदिनाथ पेठकर, अरूण कदम, प्रदिप पाटील, शेखर बोडरे, संतोष देशमाने, प्रकाश पाटील, संग्राम कदम, तसेच राजस्फूती नवरात्रोत्सव मंडळ व शंभूराजे ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------------Post a Comment

0 Comments