Daily Mahasatta

Daily Mahasatta

आभाळमाया ' च्या ४३ व्या अंकाचे प्रकाशन

'सांगली (प्रतिनिधी)

आभाळमाया फौडेशन तर्फे प्रकाशित केले जात असलेले 'आभाळमाया च्या ४३ व्या अंकाचे प्रकाशन जेष्ठ समीक्षक वैजनाथ महाजन सर प्राचार्य कणसे सर, नितीन नायक सर, डॉ विकास व जया कुर्हेकर, एम एस राजपूत सर यांचे हस्ते रविवार २०२१ रोजी स्टुडिओ ८ ८ ८ येथे कोविद १९ चे नियम पाळत करण्यात आले. याच वेळी डॉ जया कुर्हेकर यांचे जयोस्तुते हे पहिलेच पुस्तक देखील प्रकाशित करण्यात आले.  आभाळमायाचे श्री बाळासाहेब चौगुले यांचे ८८ वाढदिवसाचे निमित्याने प्रमोद चौगुले यांचा पहिला ८८ कवितांचा कवितासंग्रह निराली हा कवी आनंद नावाने प्रकाशित झाला. आभाळमाया ने दत्तक घेतलेल्या जुनी धामणी गावाच्या पुरग्रस्थांना ८८ साडी ८८ शिधा ८८ शाळांचे किट तसेच करोली एम येथे चंद्रकांत देशमुख व सांगली मिरज कुपवाड येथे सिद्धिविनायक हिरो यांचे मार्फत ८८ लिंब पिंपळ करंज अशी झाडे लावण्यात आली.

यावेळी प्रमोद चौगुले ए श्रीकांत तारळकरण वर्धमान व श्रीकांत पाटील , मनीष जैन: सचिन लड्डा नारायण उंचावले किरण यादवार मोहित चौगुने सुमेध व सौमीत शाह मल्लिकार्जुन सिदगंट्टी,कपिल सूर्यवंशी सुबोध पाठक उमेश वंडे अशी सगळीच आभाळमाया परिवारातील मंडळी उपस्थितीत होती. बाळासाहेब चौगुले यांनी आरोग्यवर्धक शंभरी गाठावी व आभाळमायार्थ अनेक नवीन उपक्रम सुरु ठेऊन या महापूर महामारी व पुढील येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यास मदत होऊ दे अशा आशयाचे बोल वैजनाथ महाजन सर व कणसे सर यांनी काढले

Post a Comment

2 Comments

  1. "जयोस्तुते" ऊचित व्यक्तीचे यथार्थ कार्य परीक्षण व रसग्रहण.

    ReplyDelete
  2. श्याम कुर्‍हेकर.

    ReplyDelete