Daily Mahasatta

Daily Mahasatta

मंत्री विश्वजीत कदम यांना दुसऱ्यांदा मोठा धक्का, दिग्गज नेत्याने ठोकला काँग्रेसला रामराम


कडेगाव चे पाणीदार नेतृत्व काँग्रेसचे प्रमुख नेते डी. एस. बापू देशमुख यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे मंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या गटाला महिन्याभरातच दुसऱ्यांदा मोठा धक्का बसला आहे.
कडेगांव (सचिन मोहिते)
कडेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक तोंडावर आली असताना कडेगाव शहरांमध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये जोरदार इन्कमिंग चालू झालेले आहे. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढावा बैठकीत शरद लाड यांनी कडेगाव नगर पंचायतीची निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी दर्शविली होती. त्यामध्ये कडेगाव नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका सौ.निता देसाई यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलेला होता व त्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या प्रभागातील विविध विकास कामांचे उद्घाटन राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केले होते तरी देखील त्यांच्या प्रभागांमध्ये राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते पुन्हा एकदा उद्घाटन झाले व या उद्घाटनावेळी विकास कामाच्या बोर्डवरती राष्ट्रवादीचे वैभव देसाई यांच्या नावावर पट्टी लावण्याचा एक अगळा वेगळा प्रकार घडलेला होता.

या प्रकारांमध्ये वैभव देसाई यांच्या समर्थकांनी जोरदार हल्लाबोल केला. तर प्रभागातील बरेच काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यामध्येच भर म्हणून कडेगाव शहरासाठी जे काम मोठ मोठ्या मंत्री, आमदार, खासदार यांना जमले नाही. तो कडेगाव शहराचा ज्वलनशील पाणीप्रश्न डी एस देशमुख यांनी आपल्या आंदोलनातून मार्गी लावला व आज रोजी ही ते निरनिराळ्या ज्वलनशील प्रश्नावर कडेगाव शहरांमध्ये त्यांच्या पाणी संघर्ष समिती मार्फत  आंदोलन करून जनतेची सेवा करत आहेत. त्यांच्या या जनसेवेची दखल आमदार अरुण अण्णा लाड व जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते शरद भाऊ लाड यांनी घेतली. व त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पक्ष प्रवेश सोहळा घडवून आणला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील(साहेब) यांच्या हस्ते इस्लामपूर या ठिकाणी झाला. डी.एस.(बापू) देशमुख यांच्यासोबत काँग्रेस च्या सूर्याजी देशमुख, बाळू चव्हाण, सागर लाटोरे, शिवाजी चव्हाण, विकी पवार, यशवंत देशमुख, संजय माळी,काशिनाथ चव्हाण,संतोष चव्हाण,विकी पवार इत्यादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला या पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जयदीप काका यादव व ज्येष्ठ नेते बाळासाहेब वत्रे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एका महिन्यातच काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments